(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अभिषेकसोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच ऐश्वर्यानं असं काही केलं की, सारेच अवाक् झाले....
ऐश्वर्या राय अनेकदा मुलगी आराध्यासोबत दिसते. अवॉर्ड शो असो किंवा एखादा कार्यक्रम किंवा फॅमिली फंक्शन असो… गेल्या काही दिवसांत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र कुठेतरी गेले असतील, असे फार कमी प्रसंग आलेत.
Aishwarya Rai, Abhishek Bachchan: ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा बऱ्याच काळापासून रंगल्या आहेत. पण, अद्याप दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. नुकतीच ऐश्वर्या राय मुलगी आराध्या बच्चनसोबत SIIMA मध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिच्या हातात लग्नाची अंगठी दिसत नव्हती, नेमकं हेच चाहत्यांनी हेरलं. त्यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, आज आठवडाभरानंतर ऐश्वर्या रायनं तिच्या स्टायलिश पोजमधून घटस्फोटांच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. दरम्यान, ऐश्वर्या आराध्यासोबत पॅरिस फॅशन वीकमध्ये पोहोचली आहे. या इव्हेंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या राय अनेकदा मुलगी आराध्यासोबत दिसते. अवॉर्ड शो असो किंवा एखादा कार्यक्रम किंवा फॅमिली फंक्शन असो… गेल्या काही दिवसांत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन एकत्र कुठेतरी गेले असतील, असे फार कमी प्रसंग आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऐश्वर्या रायच्या व्हिडीओमध्ये ती तिच्या लग्नाची अंगठी फ्लाँट करताना दिसत आहे.
ऐश्वर्याकडून घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम
नुकताच Reddit वर ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती फ्लोरल लाँग कोटमध्ये दिसत आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये पोहोचलेली ऐश्वर्या राय वारंवार तिची व्ही आकाराची अंगठी फ्लाँट करत आहे. या व्हिडीओनंतर घटस्फोटाच्या अफवेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, अभिनेत्रीला खूप ट्रोल केलं जात आहे. व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरनं म्हटलंय की, "तिची इच्छा आहे की, तुम्ही लोकांनी तिला अंगठी फ्लॉन्ट करताना पाहावं." दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, "आधी अंगठी काढून ठेवली, त्यानंतर चर्चांना उधाण आलं, म्हणून पुन्हा घातली." रिंग फ्लाँट करताना तिनं कॅमेऱ्यासमोर पोजही दिल्या आहेत. तर एका युजरनं म्हटलं की, “ही लग्नाची अंगठी नसून ही अंगठी विवाहित महिला परिधान करतात.”
दरम्यान, 2006 मध्ये 'उमराव जान'च्या सेटवर अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला आणि हळूहळू त्यांचं प्रेम फुलत गेलं. त्यानंतर वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केलं. 16 नोव्हेंबर 2011 रोजी दोघांच्या पोटी गोंडस मुलीनं जन्म घेतला. तिचं नाव त्यांनी आराध्या ठेवलं.
ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सध्या चाललंय काय?
बीटाऊनचं सर्वाधिक चर्चेत असणारं कपल म्हणजे, ऐश्वर्या-अभिषेक. पण हे कपल सध्या एकत्र दिसत नाही. दोघेही वेगवेगळे स्पॉट होतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच, अजून दोघांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सध्या चाललंय काय? हा प्रश्न चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :