एक्स्प्लोर

Aishwarya Rai, Abhishek Bachchan: अभिषेकसोबत वाद झाल्यानंतर सर्वात आधी ऐश्वर्या करते 'हे' काम; दोघांमध्ये सध्या चाललंय काय?

Aishwarya Abhishek Bachchan: गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यात.

Aishwarya Rai, Abhishek Bachchan: बी-टाऊनमधील (Bollywood) अनेक जोड्या नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकीच एक म्हणजे, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). तसं पाहायला गेलं तर, दोघांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम आहे. पण गेल्या काही दिवसांपासून दोघेही एकमेकांसोबत दिसत नाहीत. अभिषेक आपल्या कुटुंबीयांसोबत, तर ऐश्वर्या मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) अनेक ठिकाणी स्पॉट होते. दोघांनाही अनेकदा वेगळं पाहिलं गेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्यात. राधिका आणि अनंत अंबानींच्या लग्नात ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत पोहोचली होती, तर अभिषेक संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत दिसला होता. असं असलं तरीदेखील घटस्फोटाच्या अफवांवर या जोडप्यानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नवरा-बायकोचं नातं आलं की, भांडणं आलीच. कदाचितच असं एखादं जोडपं असेल की, त्यांच्यात भांडणं झालेली नाहीत. रिलेशनशिपमध्ये भांडणं होणं ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे, मात्र भांडणानंतर दोघेही एकमेकांमध्ये समेट कसा घडवून आणतात, हे महत्त्वाचं असतं. याविषयी ऐश्वर्या राय बच्चननं एका जुन्या मुलाखतीत अभिषेक बच्चनसोबत भांडण झाल्यावर ती काय करते? याचा खुलासा केला होता. त्यावेळी काय म्हणालेली ऐश्वर्या पाहुयात सविस्तर... 

'सरबजीत'च्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये पोहोचलेली ऐश्वर्या 

ऐश्वर्या राय बच्चन 2016 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या 'सरबजीत' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचली होती. ऐश्वर्यासोबतच चित्रपटाचा सहअभिनेता रणदीप हुड्डाही तिच्यासोबत दिसला होता. या शोदरम्यान ऐश्वर्याला विचारण्यात आलं की, अभिषेकसोबत भांडण झाल्यावर आधी कोण सॉरी म्हणतं, तेव्हा ऐश्वर्यानं दिलेलं उत्तर लोकांना खूप आवडलं. तिच्या उत्तराची सर्वांनी वाह वाह केली होती. 

ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सर्वात आधी सॉरी कोण बोलतं? 

शोमध्ये जेव्हा कपिलनं ऐश्वर्या रायला विचारलं की, जेव्हा तिच्यात आणि अभिषेक बच्चनमध्ये भांडण होतं, तेव्हा सर्वात आधी माफी कोण मागतं? यावर नवज्योतसिंह सिद्धू म्हणाले की, "हा प्रश्न काय विचारायचा आहे? फक्त अभिषेकच बोलत असेल हे उघड आहे. यावर ऐश्वर्या राय म्हणाली होती की, “मीच बोलते, कोणताही मागचा पुढचा विचार न करता पटकन बोलून टाकते आणि विषय संपवते." ऐश्वर्याचं हे उत्तर ऐकून कपिलला धक्काच बसला आणि म्हणाला की, "तू बोलतेस? एवढी सुंदर बायको आणि सॉरीसुद्धा म्हणते? हा देवाचा कहर आहे." त्यानंतर एकच हशा पिकला होता. 

"आम्ही भांडणं मिटवल्याशिवाय झोपत नाही..."

2010 मध्ये वोग इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांना विचारण्यात आलेलं की, ते किती वेळा भांडतात, ज्यावर ऐश्वर्यानं उत्तर दिलेलं की, "दररोज, पण ती भांडणं फारशी गंभीर नसतात, काही लहान गोष्टींवरून असतात." बद्दल आहेत.” यावर अभिषेक बच्चन म्हणत होता की, आम्हा दोघांचा नियम आहे की, भांडण झालं तर त्यानंतर ते सोडवल्याशिवाय झोपायचं नाही.

'उमराव जान'च्या सेटवर जुळलं प्रेमाचं सूत 

2006 मध्ये 'उमराव जान'च्या सेटवर अभिषेक बच्चन ऐश्वर्या रायच्या प्रेमात पडला आणि हळूहळू त्यांचं प्रेम फुलत गेलं. त्यानंतर वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केलं. 16 नोव्हेंबर 2011 रोजी दोघांच्या पोटी गोंडस मुलीनं जन्म घेतला. तिचं नाव त्यांनी आराध्या ठेवलं.

ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सध्या चाललंय काय? 

बीटाऊनचं सर्वाधिक चर्चेत असणारं कपल म्हणजे, ऐश्वर्या-अभिषेक. पण हे कपल सध्या एकत्र दिसत नाही. दोघेही वेगवेगळे स्पॉट होतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. तसेच, अजून दोघांकडूनही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे ऐश्वर्या-अभिषेकमध्ये सध्या चाललंय काय? हा प्रश्न चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Karisma Kapoor Kissing Scene: आईसमोरच करिश्मानं शूट केलेला सर्वात लांब किसिंग सीन, 3 दिवस अन् 47 रिटेकमध्ये पूर्ण झालेला शॉट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget