Ahan Shetty Break Up : सुनील शेट्टीचा लेक अहानचा गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप; 11 वर्षांचं नातं तुटलं
Ahan Shetty Tania Shroff Break Up : अहान शेट्टीचा गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप झाला आहे. 11 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ते नातं संपवलं आहे.
Ahan Shetty Tania Shroff Break Up : बॉलिवूड मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचा मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत (Tania Shroff) ब्रेकअप झाला आहे. गेल्या 11 वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते. आता 11 वर्षांनंतर त्यांचं नातं तुटलं आहे.
अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ लहानपणापासून एकमेकांचे खास मित्र आहेत. 11 वर्षांपासून ते रिलेशनमध्ये होते. अहान आणि तानिया यांचं शालेय शिक्षणदेखील एकत्र झालं आहे. त्यावेळी ते एकमेकांचे खास मित्र होते. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर 11 वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ यांचा ब्रेकअप झाल्याने चाहत्यांना
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ यांचा ब्रेकअप झाला आहे. गेल्या महिन्यातच त्यांचा ब्रेकअप झाला आहे. अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ 11 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा होती. पण आता त्यांचा ब्रेकअप झाला असून दोघांचे रस्ते वेगळे झाले आहेत.
View this post on Instagram
अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ यांचा ब्रेकअप नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. अहान आणि तानिया यांनी ब्रेकअपसंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अहान आणि तानिया यांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून ते एकत्र दिसून आलेले नाहीत.
अहान-तानियाबद्दल जाणून घ्या...
अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ हे लोकप्रिय कपल आहे. दोघांचा ब्रेकअप झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. अहान शेट्टी हा बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. 'तडप' या सिनेमाच्या माध्यमातून 2021 मध्ये त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमता अहानसोबत तारा सुतारियादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून आली होती. तानिया ही मॉडेल आहे.
तानिया श्रॉफ कोण आहे? (Who is Yania Shroff)
तानिया श्रॉफ एक लोकप्रिय मॉडेल आहे. जेदेव आणि रोमिला श्रॉफ यांची ती मुलगी आहे. जेवेद हे लोकप्रिय उद्योगपती आहेत. तानिया श्रॉफ अनेकदा सुनील शेट्टींच्या कुटुंबियांसोबत स्पॉट झाली आहे. 'तडप'च्या स्क्रीनिंगदरम्यान तानिया आणि अहान एकत्र दिसून आले होते. सुनील शेट्टी यांनी तानियाला आपल्या लेकीप्रमाणे वागवलं आहे.
संबंधित बातम्या