Samrat Prithviraj : उत्तरप्रदेशनंतर मध्यप्रदेशमध्येदेखील 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार; शिवराज सिंह चौहन यांची माहिती
Samrat Prithviraj : मध्यप्रदेश सरकारने 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
Samrat Prithviraj : मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश सरकारने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj) हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट करत लिहिले आहे, 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळेच आम्ही 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक तरुणांना पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनपट पाहता येणार आहे".
उत्तर प्रदेशमध्ये 'सम्राट पृथ्वीराज' करमुक्त होणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील 'सम्राट पृथ्वीराज' हा सिनेमा उत्तर प्रदेशमध्ये करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी 'सम्राट पृथ्वीराज'चे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. सिनेमा पाहिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी लगेचच हा सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली. योगी आदित्यनाथ यांनी याआधी 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमादेखील उत्तरप्रदेशमध्ये करमुक्त केला होता.
महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान के जीवन पर आधारित श्री @akshaykumar जी अभिनीत फिल्म "सम्राट पृथ्वीराज" को मध्यप्रदेश में हमने टैक्स फ्री करने का निर्णय लिया, जिससे महान सम्राट के जीवन को अधिक से अधिक युवा देखें और उनमें मातृभूमि के प्रति अधिक प्रेम जागृत हो।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 2, 2022
अक्षय कुमारने घेतल्या मध्य प्रदेशातील 50 बालवाड्या दत्तक, बालकांच्या विकासासाठी 1 कोटी मदत
मध्यप्रदेशातील बालकांचा सर्वांगिण विकास होणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. अक्षय कुमारने या गोष्टीची दखल घेत बालवाडीतील मुलांना मदत करण्याचे ठरवले. त्यानुसार खिलाडी कुमारने एक कोटी रुपये देण्याचा आणि 50 बालवाड्यांना दत्तक घेण्याचा संकल्प केला आहे. यामुळेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अक्षय कुमारचे आभार मानले होते
खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार सध्या त्याच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार राजा पृथ्वीराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर संयोगिताच्या भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
3 जूनला होणार प्रदर्शित
‘सम्राट पृथ्वीराज’ हा सिनेमा 3 जून रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती होत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी 'सम्राट पृथ्वीराज' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
संबंधित बातम्या