Raqesh Shamita Song : ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; 'तेरे विच रब दिसदा' सोशल मीडियावर व्हायरल
Shamita Shetty - Raqesh Bapat : राकेश बापट आणि शमिता शेट्टीचं 'तेरे विच रब दिसदा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Raqesh Shamita Song : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' (Tere Vich Rab Disda) असे या गाण्याचे नाव आहे.
राकेश बापट आणि शमिता शेट्टीचे 'तेरे विच रब दिसदा' हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्यात राकेश आणि शमिता रोमॅंटिक अंदाजात दिसत आहेत. राकेश आणि शमिताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
'तेरे विच रब दिसदा' सोशल मीडियावर व्हायरल
राकेश आणि शमिताच्या 'तेरे विच रब दिसदा' हे गाणं मीट ब्रदर्ससह सचेत आणि परंपराने गायलं आहे. तर या गाण्याचे बोल मनोज मुंतशीरने लिहिले आहेत. राकेश बापट आणि शमिता शेट्टीसह या गाण्यात सचेत आणि परंपरादेखील दिसून येत आहेत. अल्पावधीतच या गाण्याला दोन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
शमिता आणि राकेशच्या नात्याची सुरुवात कशी झाली?
शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या नात्याची सुरुवात 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झाली होती. याच घरात दोघांची पहिली भेट झाली होती. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतरही ते अनेक कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात भांडण सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्रेकअप झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
संबंधित बातम्या