R Madhavan : आर. माधवनच्या Rocketry: The Nambi Effect सिनेमाचे नवे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित
R Madhavan Film Rocketry : आर. माधवनच्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
R Madhavan Film Rocketry : The Nambi Effect : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला आहे. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये (75th Cannes Film Festival) या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या महोत्सवातदेखील या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आता या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे.
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या सिनेमाचे धमाकेदार पोस्टर प्रदर्शित झाले आहे. हा सिनेमा 1 जुलै 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आता आर. माधवनने सोशल मीडियावर या सिनेमाचे पोस्टर शेअर केलं आहे. हा सिनेमा शास्त्रज्ञ नांबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात आर. माधवन नांबी नारायणच्या भूमिकेत दिसणार आहे. आर.माधवनच्या या सिनेमात शाहरुख खान आणि सूर्यादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' सिनेमासाठी आर.माधवनने घेतली विशेष मेहनत
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. या सिनेमाचा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमासाठी आर. माधवनने विशेष मेहनत घेतली आहे.
ट्रेलर झळकला टाइम्स स्क्वेअरवर
आर. माधवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये टाइम्स स्क्वेअरवर 'रॉकेट्री' चित्रपटाचा ट्रेलर दिसला होता. व्हिडीओमध्ये आर माधवनसोबतच नंबी नारायण हे देखील दिसत होते. व्हिडीओ शेअर करुन आर माधवननं त्याला कॅप्शन दिलं, 'टाइम्स स्क्वेअरच्या बिलोबर्डवर रॉकेट्रीचा ट्रेलर लाँच'.आर माधवननं शेअर केलेल्या व्हिडीओला अभिनेत्री ईशा देओल आणि अभिनेता रोहित रॉय यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. तसेच आर माधवनच्या चाहत्यांनी देखील या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.