Adipurush: आदिपुरुष चित्रपटावरुन नवा वाद ; दिल्ली न्यायालयात याचिका दाखल
आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली आहे.
Adipurush: बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेता प्रभास (Prabhas) यांच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज जाला. त्यानंतर अनेकांनी या टीझरवर टीका केली. काहींनी या टीझरमधील सैफच्या लूकवर टीका केली तर काहींनी टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या VFX वर आक्षेत घेतला. आता आदिपुरषचा हा वाद दिल्लीच्या तीस हजारी न्ययालयापर्यंत पोहचला आहे. आदिपुरुष चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली आहे.
याचिकेमध्ये याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे की, यूट्यूबसह इंटरनेट मीडियाला चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आणि टीझरमधून आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. 'आदिपुरुष' चित्रपटात भगवान राम आणि हनुमानाची पात्रे चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असंही याचिकाकर्ते राज गौरव यांचे मत आहे.
10 ऑक्टोबरला होणार सुनावणी
यासोबतच या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणावर सोमवारी सकाळी 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणासारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरूपाची छेडछाड करता येणार नाही. रामायण हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि आध्यात्मिक आणि धर्माचा भाग आहे. ते म्हणाले की, भगवान रामाची प्रतिमा शांत होती, तर आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमध्ये ते अत्याचारी, प्रतिशोधी आणि संतप्त व्यक्ती म्हणून दाखवले आहेत.
12 जानेवारी 2023 रोजी IMAX आणि 3D मध्ये 'आदिपुरुष' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे.हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये 'आदिपुरुष' सिनेमा प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या कंपनीनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: