एक्स्प्लोर
Advertisement
सुशीलकुमार शिंदेंच्या नातवासोबत रिलेशनशीपबद्दल सारा म्हणते...
'मी डेट केलेला वीर पहारिया हा एकमेव मुलगा आहे. माझ्या आयुष्यात इतर कोणीही बॉयफ्रेण्ड्स नव्हते.' असं सारा अली खानने सांगितलं. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू.
मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची कन्या, नवोदित अभिनेत्री सारा अली खानने पहिल्यांदाच आपल्या रिलेशनशीपबद्दल उघड बोलणं पसंत केलं आहे. वीर पहारिया हा माझा एकमेव बॉयफ्रेण्ड होता, त्याच्या आधी किंवा नंतर कोणीच नाही, अशी कबुली साराने दिली. वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू.
'फिल्मफेअर'ने घेतलेल्या मुलाखतीत साराला तिच्या लव्ह लाईफबद्दल छेडण्यात आलं. 'मी डेट केलेला वीर पहारिया हा एकमेव मुलगा आहे. माझ्या आयुष्यात इतर कोणीही बॉयफ्रेण्ड्स नव्हते.' असं साराने सांगितलं. विशेष म्हणजे वीरचा भाऊ शिखर पहारिया आणि श्रीदेवीची कन्या, अभिनेत्री जान्हवी कपूरही एकमेकांना डेट करत होते, असं म्हटलं जातं.
'मी सिंगल आहे. मी कोणालाही डेट करत नाहीये.' असं सांगतानाच आपलं कधीच हार्टब्रेक झालं नाही, अशीही कबुली साराने दिली.
सारा आणि अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन यांचंही नाव जोडलं जात होतं. मात्र यामध्ये तथ्य नसल्याचं दिसत आहे. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये साराने अभिनेता कार्तिक आर्यन आपला सेलिब्रेटी क्रश असल्याचं म्हटलं होतं. त्यावर कार्तिकनेही तिला कॉफी डेटवर नेण्याची इच्छा बोलून दाखवली. अभिनेता रणवीर सिंहने दोघांची भेटही घडवून आणली होती.
साराने सुशांत सिंग राजपूतसोबत 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती रणवीर सिंहसोबत 'सिम्बा'मध्ये झळकली. दोन्ही चित्रपटांतील तिच्या भूमिकांचं बॉलिवूड आणि चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement