अभिनेत्री काम्या पंजाबी यांचं राजकारणात पाऊल; 'या' पक्षात केला प्रवेश
Kamya Punjabi join congress: टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी आता राजकारणातही उतरली आहे. अभिनेत्री काम्या पंजाबी हिने बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
![अभिनेत्री काम्या पंजाबी यांचं राजकारणात पाऊल; 'या' पक्षात केला प्रवेश Actress Kamya Punjabi join congress party in presence of Mumbai Congress president Bhai Jagtap अभिनेत्री काम्या पंजाबी यांचं राजकारणात पाऊल; 'या' पक्षात केला प्रवेश](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/27/e42df0b629b4fcbc2d096e769d6a3f01_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kamya Punjabi join congress: टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) आता राजकारणातही उतरल्या आहेत. अभिनेत्री काम्या पंजाबी हिने बुधवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या उपस्थितीत काम्या पंजाबी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काम्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावरही तd/e अनेकवेळा सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपले मत मांडत असतात.
काम्या पंजाबी लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करेल अशी चर्चा आधीपासूनच होती. मिळालेल्या माहितीनुसार, काम्याला नेहमीच राजकारणात यायचे होते, पण तिच्या कामामुळे आणि व्यस्त वेळापत्रकामुळे तिला तसे करता आले नाही. मात्र, आता तिचा 'शक्ती अस्तित्व के एहसास की' हा शो संपल्याने अखेर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra: Actress Kamya Punjabi joins Congress in presence of Mumbai Congress president Bhai Jagtap pic.twitter.com/8B2t3s47Qh
— ANI (@ANI) October 27, 2021
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबीबद्दल सांगायचे तर त्या अनेक यशस्वी टीव्ही शोचा भाग आहेत. बिग बॉस सीझन 7 मध्येही त्या दिसल्या आहेत. बिग बॉस सीझन-7 मधील काम्या यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. अलीकडेच करवा चौथच्या निमित्ताने काम्या पंजाबी यांनी आपल्या पतीसोबत करवा चौथ साजरा करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्यांनी गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, तसेच त्यांचे अनेक फोटो शेअर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)