एक्स्प्लोर
Advertisement
तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला, मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या गुढीपाडव्याला शुभेच्छा
'तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला 😘 ' असं 'हिंदीमिश्रित मराठी' भाषेतील ट्वीट करत भूमीने स्वतःचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केसात गजरा, हिरवी साडी अशा पारंपरिक पोशाखात भूमी दिसत आहे.
मुंबई : शुभेच्छा देण्याच्या उत्साहात अनेक सेलिब्रेटी गडबड करताना आपण पाहतो. यावेळी बॉलिवूडमध्ये चमक दाखवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीने घोळ घातला आणि ती ट्रोलिंगची शिकार ठरली. अभिनेत्री भूमी पेडणेकरने गुढीपाडव्याला चक्क मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
'तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला 😘 ' असं 'हिंदीमिश्रित मराठी' भाषेतील ट्वीट करत भूमीने स्वतःचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये केसात गजरा, हिरवी साडी अशा पारंपरिक पोशाखात भूमी दिसत आहे. विशेष म्हणजे भूमीने #HappyGudiPadwa #marathimulghi #happynewyear असे हॅशटॅगही दिले आहेत.
भूमीची कौटुंबिक पार्श्वभूमी मराठी आहे. तिचं बालपणही मुंबईत गेलं. जुहू भागातील आर्य विद्यामंदिरमध्ये तिचं शालेय शिक्षण झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भूमीने ही गल्लत कशी केली, याबाबत अनेक जण चक्रावले. त्यातही हॅशटॅगमध्ये 'मराठी मुलगी' लिहिल्यामुळे अनेक जणांनी यथेच्छ तोंडसुख घेतलं. भूमीने 2015 साली दम लगा के हैशा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती 'टॉयलेट एक प्रेमकथा', 'शुभमंगल सावधान', सोनचिरीया यासारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात दिसली. त्याचप्रमाणे मॅन्स वर्ल्ड, लस्ट स्टोरीज अशा वेब सीरीजमध्येही ती झळकली. भूमीच्या अभिनयाचं प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केलं. अल्पावधीतच तिच्या अभिनयाचे चाहते झाले. मात्र सोशल मीडियावरील एखादी चूक तुम्हाला सहज ट्रोलिंगचं सावज ठरवते, हेच खरं.तिल गुड घ्या,गोड़ गोड़ बोला 😘#HappyGudiPadwa #GoodMorning #marathimulghi #happynewyear pic.twitter.com/neYA8Z0fgt
— bhumi pednekar (@bhumipednekar) April 6, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement