एक्स्प्लोर

R Madhavan : अभिनेता आर माधवननं मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, घराची किंमत ऐकून बसेल धक्का

R Madhavan Luxurious House in Mumbai : अभिनेता आर माधवन यानं 'मायानगरी' मुंबईत घरं खरेदी केलं आहे. या घराची किंमत कोट्यवधी रुपये आहे.

मुंबई : 'रहना है तेरे दिल मैं' (Rehnaa Hai Terre Dil Mein) चित्रपटातील 'मॅडी' बनून लाखो प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन असलेला अभिनेता म्हणजे आर माधवन. अलिकडेच आलेल्या शैतान (Shaitaan Movie) चित्रपटातून आर माधवन खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. या भूमिकेचं प्रेक्षकांनी भरपूर कौतुक केलं. शैतान चित्रपटातील आर माधवनच्या विलनची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आर माधवन यानं सर्व प्रकारच्या भूमिका साकारत त्यांना न्याय दिला आहे. त्याच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. आर माधवन सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो, ज्यातून तो चाहत्यांना वेळोवेळी अपडेट देत असतो. 

आर माधवननं मुंबईत खरेदी केलं आलिशान घर

अभिनेता आर माधवनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आर माधवननं मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. मुंबईंतील बीकेसीमध्ये त्यानं एक आलिशान फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलं आहे. अलीकडेच आर माधवनने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता आर माधवने बीकेसीमध्ये एक प्रॉपर्टी खरेदी केली आहे. 

आलिशान घरात अनेक सुविधा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर माधवने बीकेसीमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. हे घरं राहण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा फ्लॅट अंदाजे 389 चौरस मीटर म्हणजेच 4,182 चौरस फूटमध्ये पसरलेला आहे. ज्यामध्ये दोन पार्किंगसाठीदेखील जागाआहे. हे घरं सिग्निया पर्ल येथे आहे. हा आलिशान फ्लॅट उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज आहे. 

आर माधननच्या आलिशान घराची किंमत किती?

आगामी काळात आर माधवनचा मुंबईतील हाच नवा पत्ता असेल, असं बोललं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 22 जुलै रोजी या आलिशान घराचा करार पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी आर माधवनला 1 कोटी पाच लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरावं लागल्याची माहिती आहे. या आलिशान घराची किंमत 17.50 कोटी रुपये आहे. 

या चित्रपटांमध्ये झळकणार आर माधवन

शैतान चित्रपटानंतर अभिनेता आर माधवन लवकरच दिग्दर्शक एस शशिकांत यांच्या 'टेस्ट' या चित्रपटात दिसणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटात नयनतारा आणि सिद्धार्थ यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे. याशिवाय तो लवकरच एका बायोपिक आणि सायन्स फिक्शन चित्रपटातही झळकणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

R Madhavan Diet : ना जिम, ना वर्कआउट; आर माधवने 21 दिवसात कसं कमी केलं वजन, वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चाAmbani Ganpati Celebration : अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणरायाचं आगमन, बॉलीवूडकरांकडून बाप्पाचं दर्शनEknath khadse Special Report : महायुतीचं सरकार जावो, मविआ येवो : एकनाथ खडसेManoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajendra Raut on Manoj Jarange : मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
मनोज जरांगेंनी कोणाची सुपारी घेतली? तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाजतात? राजेंद्र राऊतांचा सवाल
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Nanded : नांदेडमधील हॉटेल व्यावसायिकाच्या मृत्यूचे गुढ उलगडले, मुलानेच सुपारी देऊन काढला वडिलांचा काटा
Wine : वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
वाईन खराब होते का? बाटली उघडल्यानंतर वाईन किती दिवसात प्यावी? रेड वाईन, पोर्ट वाईन किती दिवस टिकते?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2024 | शनिवार
Basmati Export: बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
बासमतीची निर्यात 15% ने वाढली हो! अमेरिकेसह 'या' देशांमध्ये वाढली मागणी
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Indian Railway : चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
चालत्या ट्रेनमधील टॉयलेटमधून आवाज आला, दरवाजा उघडल्यावर धक्कादायक घटना समोर, दिव्यांग महिलेसोबत...
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Embed widget