एक्स्प्लोर

Bollywood Actro Struggle Days: झोपडीत राहायचा, रस्त्यावर भीक मागायचा; कधीकाळी बॉलिवूडच्या 'या' दिग्गज स्टारनं हलाखीत दिवस काढले, पण मग...

Kader Khan Struggle Days: कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल इथे झाला. मात्र, नंतर त्याचे आई-वडील त्याला मुंबईत घेऊन आले.

Kader Khan Struggle Days: बॉलिवूड (Bollywood) स्टार म्हटलं की, लाईमलाईट, पैसा, महागडे ब्रँड्स, त्यांची लाईफस्टाईल... नेहमीच आपलं सर्वांचं लक्ष वेधते. पण, असे अनेक स्टार्स आहेत. ज्यांनी हे सर्व फेम स्वतः मेहनतीनं कमावलं आणि शून्यातून आपलं नाव मोठं केलं. त्यापैकीच एक नाव म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते कादर खान (Kadar Khan) . आपल्या कॉमेडीनं चाहत्यांना खळखळवून हसवणारे कादर खान यांनी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आपल्या कॉमेडी अंदाजानं कादर खान यांनी सर्वांच्या मनात आपली एक वेगळी छाप सोडली. त्यांचा अभिनय अप्रतिम, पण त्यासोबतच त्यांनी साधलेलं टायमिंगची तर बातच और... कादर खान यांनी अभिनेते गोविंदा यांच्यासोबत अनेक चित्रपट केले. दोघांची जोडी चाहत्यांनी खूपच आवडली. या जोडीला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. कादर खान यांनी खलनायकाच्या भूमिकाही उत्तम निभावल्या. पण, यशाचं सर्वोच्च शिखर गाठणं कादर खान यांच्यासाठी फारसं सोपं नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांचं आयुष्य अत्यंत हलाखीत गेलं. 

कादर खान यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. त्यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबुल इथे झाला. मात्र, नंतर त्याचे आई-वडील त्याला मुंबईत घेऊन आले. मुंबई आल्यानंतर हे कुटुंब झोपडपट्टीत राहू लागलं. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत वाईट होती, त्यांनी खूप हलाखीत दिवस काढले. नशीबाचे भोग कमी होते, तेच सावत्र वडिलांचा जाचही कादर खान यांच्या वाट्याला आला होता. त्यांचे सावत्र वडील त्यांना भीक मागायला पाठवायचे. 

कादर खान यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. तेव्हा त्यांच्या आईचं जबरदस्तीनं दुसरं लग्न लावलं. ज्या व्यक्तीसोबत त्यांच्या आईचं दुसरं लग्न लावलं, ती व्यक्ती अत्यंत वाईट आणि क्रूर होती. बालपणातच सावत्र वडिलांकडून कादर खान यांचा खूपच छळ केला जायचा. त्यांच्या सावत्र वडिलांनी अनेकदा कादर खान यांना त्यांच्या खऱ्या वडिलांकडे पैसे मागायला सांगितले होते.

अनेकदा उपाशीच झोपले, लहान वयातच शिक्षण सुटलं... 

कादर थान यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्यांचं कुटुंब आठवड्यातून तीन दिवस उपाशी झोपायचं. ते गरिबीतून कधी बाहेर पडूच शकले नाही. कादर खान यांनी लहान वयातच शाळा सोडण्याचा निर्णय घेतला होता आणि झोपडपट्टीतील इतर मुलांप्रमाणे स्थानिक मिलमध्ये काम केलं. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कादर खान यांनी मोठा निर्णय घेतल्याचं त्यांनीच अनेक मुलाखतींमध्ये बोलताना सांगितलं होतं. त्यांची आई त्यांना अभ्यासासाठी मदरशात पाठवायची, असं देखील कादन खान यांनी एका मुलखातीत बोलताना सांगितलं होतं. 

एका मुलाखतीत बोलताना कादर खान म्हणाले होते की, "माझी आई म्हणायची की, जर तू मजुरी केलीस, तर आयुष्यभर तुझी कमाई 3 रुपये प्रतिदिन असेल. पण, लक्षात ठेव, जर तुला या गरीबीतून बाहेर पडायचं असेल, तर तुला शिकावंच लागेल." आईच्या सल्ल्यानं त्यांनी शाळेत अॅडमिशन घेतलं. त्यानंतर त्यांनी शिकायला पुन्हा सुरुवात केली. पुढे जाऊन ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर इंजिनिअरिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. 

दरम्यान, कादर खान यांच्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर, त्यांनी अंदाज, आँखे, हिरो हिंदुस्थानी, दिल ही तो है, वाह...तेरा क्या कहना, हीरो नंबर 1, मिस्टर एंड मिसेज खिलाडी, दिल है बेताब यांसारख्या असंख्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अभिनेत्रीच्या डोक्यावरचे केसे गेलेले पाहून मुलीनं फोडलेला टाहो; 32 कीमो-बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत कॅन्सरवर यशस्वी मात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
Bengaluru : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Video : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Poharadevi Sunil Maharaj  : पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्रABP Majha Headlines : 4 PM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 23 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaKopargaon Vidhan Sabhaकोपरगाव मतदारसंघातला वाद थेट दिल्ली दरबारी,कोल्हे परिवाराने घेतली शाहांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Vidhan Sabha : बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
बारामतीमध्ये अजितदादांविरोधात शरद पवारांचा मोहरा ठरला; अखेर जितेंद्र आव्हाडांनी सस्पेन्स संपवला!
Bengaluru : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Video : बंगळूरमध्ये सात मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या काही सेकंदात कोसळली; 7 जणांचा अंत
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
विद्यमान अपक्ष आमदार शरद पवारांच्या गळाला, आज पक्षप्रवेश करणार; उमेदवारीही निश्चित
Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटासाठी चढाओढ, बंडखोरांना रोखण्याचं आव्हान
Anna Bansode: पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
पक्षांतर्गत अन् महायुतीचा विरोध डावलला? अण्णा बनसोडेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर; नाराज गट प्रचारात दिसणार?
Priyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाल्या, वडील, आई, भावासाठी 35 वर्षे प्रचार केला, पण आता..
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
समीर भुजबळ ठाकरे गटात प्रवेश करणार का? नांदगावमधून उमेदवारी मिळणार का? नेमकं काय म्हणाले भुजबळ?
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Embed widget