एक्स्प्लोर

अभिनेत्रीच्या डोक्यावरचे केसे गेलेले पाहून मुलीनं फोडलेला टाहो; 32 कीमो-बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत कॅन्सरवर यशस्वी मात

सतत आजारी पडायची, तेव्हा अभिनेत्रीला शंका आली आणि तिनं काही टेस्ट केल्या. त्यानंतर रिपोर्ट्समधून तिला कॅन्सरचं निदान झालं, त्यानंतर मात्र शीतल पुरती कोसळून गेली आणि तिच्यासाठी काम करणंही कठीण होऊन बसलं. 

Actress Overcomes Cancer: कॅन्सर... हा फक्त शब्द ऐकूनही अंगावर शहारे येतात. पण, उपचारादरम्यान मरणयातना भोगून जे या आजारावर यशस्वी मात करतात, त्यांचा अनुभव पुरता हादरवणारा असतो. असाच धक्कादायक अनुभव नुकत्याच कॅन्सरवर (Cancer) यशस्वी मात करुन परतलेल्या अभिनेत्रीनं सांगितला आहे. अभिनेत्रीचा अनुभव ऐकून अंगावर सर्रकन काटा येतो. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सीमर 2 फेम अभिनेत्री शीतल ठक्कर (Shital Thakkar) कॅन्सर सर्व्हायव्हर आहे. आपल्या आजारावर मात करत तिनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. 

कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या शीतल ठक्करनं TOI ला दिलेल्या मुलाखतीत नुकतेच स्वतःचे अनुभव शेअर केले आहेत.  शीतलचा कॅन्सरच्या संपूर्ण ट्रिटमेंट दरम्यानचा प्रवास खरंच खूपच प्रेरणादायी आहे. जीवन-मृत्यूची लढाई जिंकल्यानंतर शीतल गिफ्ट म्हणून ग्रीस व्हेकेशनला गेली होती. मुलाखतीत आपल्या कॅन्सर ट्रिटमेंटबाबत सांगताना अभिनेत्रीचे डोळे पाणावले होते. शीतनं सांगितलं की, ती सतत आजारी पडायची, तेव्हा तिला शंका आली आणि तिनं काही टेस्ट केल्या. त्यानंतर रिपोर्ट्समधून तिला कॅन्सरचं निदान झालं, त्यानंतर मात्र शीतल पुरती कोसळून गेली आणि तिच्यासाठी काम करणंही कठीण होऊन बसलं. 

सीरिअलच्या शुटिंगदरम्यान दोन महिन्यांपर्यंत ती फक्त क्लोज अप शॉट्स देत होती. शोमधून ब्रेक घेतल्यानंतर, तिच्या टेस्ट करण्यात आल्या आणि त्यामधून निदान झालं की, तिला कर्करोगाची लागण झाली आहे. म्हणून तिनं काही काळासाठी इंडस्ट्रीला अलविदा केलं.

32 केमोथेरपी सेशन्स, त्यानंतर बोन मॅरो ट्रान्सप्लांट

मुलाखतील बोलताना शीतल म्हणाली की, ती आता पूर्णपणे बरी आहे, त्यामुळे तिची कहाणी ती सांगू शकते. ती म्हणाली की, मी 32 केमोथेरपी सेशन्स घेतले आहेत. त्यानंतर कॅन्सर पुन्हा होऊ नये म्हणून मला बोन मॅरो ट्रान्सप्लांटही करावं लागलं. यानंतर मला 36 दिवस हॉस्पिटलमध्ये आयसोलेशनमध्ये रहावं लागलं. 

ज्यावेळी असं काहीतरी घडतं, त्यावेळी तुम्हाला समजतं की, लहान-सहान आनंद, कुटुंबाची साथ या काळात तुम्हाला खूप महत्त्वाची आहे. माझ्या प्रत्येक टेस्टच्या वेळी माझे पती आणि माझा भाऊ माझ्यासोबत होता. हा काळ फक्त कुटुंबच नाहीतर, संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत कठीण असतो. माझी मुलगी तेव्हा फक्त 10 वर्षांची होती, मला तिला सर्व काही समजावून सांगावं लागलं. ती खरंच खूप स्ट्रॉन्ग आहे. माझ्या ट्रिटमेंटवेळी एकदा ती खूपच रडली, केमोमुळे माझ्या डोक्यावरचे केस गेले होते. 

दरम्यान, ही केवळ शीतलची कहाणी नाहीतर प्रत्येक घराची कहाणी आहे. शीतलनं ससुराल सीमर का 2 सोबतच ये मेरी लाईफ यांसारखे शो केले आहेत. शीतलला आता वेब सीरिजमध्ये काम करायचं आहे. वेब सीरिजमध्ये लॉन्ग टाईम कमिटमेंट देण्याची गरज नसते, त्यामुळे मला वेब सीरिजमध्ये काम करायचं आहे, असं शीतल सांगते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

20 वर्षांपूर्वी शाहरुख खानच्या 'या' चित्रपटासाठी रश्मी देसाईनं शूट केलेलं इंटिमेट गाणं; आता Viral होतोय VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Seat Sharing : मविआच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यताRamdas Kadam on MVA Seat Sharing : काहीच तासात मविआ तुटणार! रामदास कदमांचा मोठा दावाABP Majha Headlines : 06 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRajkumar Badole Join NCP : भाजपचा बडा नेता ; विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव
Embed widget