एक्स्प्लोर
Advertisement
शॉर्ट्स घातल्याने आमीरची मुलगी इरा पुन्हा ट्रोल
अभिनेता आमीर खानची मुलगी इरा तिने घातलेल्या कपड्यांवरुन सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. चारचौघांत वावरताना पाय आणि दंड उघडे ठेवल्याबद्दल काही जणांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमीर खानची मुलगी इरा पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. तोकडे कपडे घातल्याबद्दल इरा खानला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच काय, तर इरा आणि आमीरविरोधात फतवा काढण्याची भाषाही काही इन्स्टाग्राम यूझर्सनी केली आहे.
सध्या, आमीर आणि इरा या बापलेकीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आमीरने काळ्या रंगाचा टीशर्ट आणि पँट घातल्याचं दिसत आहे, तर इराने ब्लॅक अँड व्हाईट स्लीव्हलेस नेकटॉप घातला असून त्याखाली पांढऱ्या रंगाच्या शॉर्ट्स घातल्या आहेत. बापलेक एकमेकांची गळाभेट घेत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
इराचा हा फोटो पाहून काही जणांचा मात्र तीळपापड झाला. इराच्या कपड्यांवरुन काही जणांनी तिला ट्रोल केलं आहे. चारचौघांत वावरताना पाय आणि दंड उघडे ठेवल्याबद्दल काही जणांनी आक्षेप घेतला आहे. तर, इराने त्वचेचं जाहीर प्रदर्शन केल्याबद्दल काही यूझर्सनी मौलवींना तिच्याविरोधात फतवा काढण्यासही सुचवलं.
अर्थात सर्वांनीच इरावर टीकेची झोड उठवलेली नाही. काही जणांनी इरा खान 'बोल्ड अँड ब्यूटीफूल' असल्याचं म्हटलं, तर कोणाला इराकडे पाहून क्रिकेटपटू रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेहचा भास झाला. सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करण्याची इराची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही आमीर खानसोबतच्या एका फोटोमुळे तिला समाजात टीकेची धनी व्हावं लागलं होतं. आमीर खानसोबतच अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, फराह खान, क्रिकेटपटू मोहम्मद शमी, मोहम्मद कैफ यांना ट्रोल करण्यात आलं होतं.View this post on InstagramMy daddy the best #irakhan #aamirkhan at @miacucinaindia brunch @viralbhayani
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement