एक्स्प्लोर

...तर 'या' चित्रपटात तिन्ही खान्ससह राणी, प्रिती, काजोल असत्या!

मुंबई : किंग ऑफ रोमान्स शाहरुख, दबंग स्टार सलमान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर या तिन्ही खान मंडळींना एकत्र एका सिनेमात पाहण्याची संधी चाहत्यांना कधीच मिळाली नाही. मात्र अशी शक्यता 15 वर्षांपूर्वी निर्माण झाली होती, हे आता समोर आलं आहे. सलमान, आमीर, शाहरुख सोबत राणी मुखर्जी, काजोल आणि प्रिती झिंटा असा मल्टिस्टारर सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळाला असता. अनुपम खेर दिग्दर्शित 'ओम जय जगदिश' मध्ये हे तीन खान एकत्र झळकू शकले असते. तिन्ही खानना एकत्रित भूमिकेसाठी विचारणा झालेला हा आजतागायतचा एकमेव चित्रपट ठरला आहे. आजही तिन्ही खानांची असलेली क्रेझ पाहता, त्याकाळी टॉपला असलेल्या तिन्ही हिरोईन्स आणि तिन्ही खान यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट चाहत्यांनी डोक्यावर उचलून धरला असता. आशुतोष गोवारीकरचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या 1993 मधील 'पहला नशा' चित्रपटात दीपक तिजोरी मुख्य भूमिकेत होता, तर शाहरुख आणि आमीरने यात कॅमिओ केला. 1994 मध्ये राजकुमार संतोषींच्या प्रचंड गाजलेल्या 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात आमीर-सलमान एकत्र दिसले होते. 1995 मध्ये राकेश रोशनचा ब्लॉकबस्टर 'करण अर्जुन'मध्ये शाहरुख-सलमान एकत्र दिसले. त्यानंतर 'कुछ कुछ होता है', 'हम तुम्हारे है सनम'मध्येही ही जोडी दिसली. मात्र तिन्ही खान एकाच स्क्रीनवर आले नाहीत. 2002 मध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला 'ओम जय जगदिश' हा चित्रपट आमीर, शाहरुख आणि सलमानला ऑफर केला होता. बॉलिवूड लाईफ या वेबसाईटने यासंदर्भात रिपोर्ट दिला आहे. तिघांनी ऑफर स्वीकारली असती, तर अनिल कपूरने साकारलेल्या मोठ्या भावाच्या म्हणजे ओमच्या भूमिकेत आमीर, फरदीन खानची भूमिका असलेल्या मधल्या भावाच्या भूमिकेत शाहरुख तर अभिषेक बच्चनने साकारलेल्या जगदीश या धाकट्या भावाच्या भूमिकेत सलमान दिसला असता. आमीरसोबत काजोल (आयेशा), शाहरुखसोबत राणी मुखर्जी (नीतू), तर सलमानसोबत प्रिती झिंटा (पूजा) झळकल्या असत्या. दुर्दैवाने या सहाही कलाकारांनी तारखा उपलब्ध नसल्याने ही भूमिका नाकारली. त्यामुळे महिमा चौधरी, उर्मिला मातोंडकर, तारा शर्मा यांच्या पारड्यात अनुक्रमे या भूमिका पडल्या. यशराज फिल्म्सनी हे कलाकार काम करणार असतील, तरच पैसे गुंतवण्याची अट घातली होती. त्यामुळे अखेर वाशू भगनानींनी हा सिनेमा प्रोड्युस केला. तिन्ही खानना एकत्रित भूमिकेसाठी विचारणा झालेला हा आजतागायतचा एकमेव चित्रपट ठरला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोलNayana Kadu on Bachchu kadu : पाचव्यांदा बच्चू कडू विजयी होतील- नयना कडूTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Devendra Fadnavis on CM Post: आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
आता मुख्यमंत्री होणे माझ्यासाठी गौण बाब, मी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत नाही: देवेंद्र फडणवीस
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Embed widget