एक्स्प्लोर

Aamir Khan : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनपट उलगडणार! आमिर खान दिसणार मुख्य भूमिकेत

Ujjwal Nikam Biopic : सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Aamir Khan Next Movie Ujjwal Nikam Biopic : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यानंतर अभिनेत्याने काही दिवस ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण आता सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान (Aamir Khan Next Movie) मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

आमिरने अभिनयक्षेत्रापासून ब्रेक घेतला असला तरी त्याच्या निर्मितीसंस्थेवर मात्र त्याचं लक्ष होतं. पण आता या ब्रेकनंतर दमदार कमबॅक करण्यासाठी आमिर सज्ज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'स्त्री' या सिनेमाचे निर्माते दिनेश विजन (Dinesh Vijan) यांच्या आगामी सिनेमात मिस्टर परफेक्शनिस्ट झळकणार आहे. 

आमिर खानला नेहमीच प्रयोग करायला आवडतात. त्याचे वेगवेगळ्या धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'मंगल पांडे : द राइजिंग'पासून ते 'दंगल'पर्यंत अनेक सिनेमांचा समावेश आहे. आता त्याच्या या सिनेमांच्या यादीत लवकरच एका सिनेमाचा समावेश होणार आहे. आमिर खान ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

उज्जवल निकम यांच्या जीवनपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. पण काही ना काही कारणाने या सिनेमावर काम करता आलं नाही. उमेश शुक्ला यांनीदेखील उज्जवल निकम यांचा बायोपिकवर काम करत असल्याचं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. पण यासंदर्भात अद्याप त्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. 

उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकमध्ये आमिर खान मुख्य भूमिकेत!

सिनेमाई गलियारोंच्या रिपोर्टनुसार, उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी आमिर खानला कोरोनाकाळाआधी विचारणा झाली होती. अनेक निर्मात्यांनी उज्ज्वल निकम यांच्या बायोपिकसाठी प्रयत्न केले. पण आता दिनेश विजन यांनी या सिनेमाची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे. एकीकडे आमिरने मनोरंजनसृष्टीतून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तो हा सिनेमा करणार का? उज्ज्वल निकम यांचा बायोपिक आमिरचा कमबॅक सिनेमा असेल का? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 

उज्जवल निकम यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Ujjwal Nikam)

उज्ज्वल निकम हे सरकारी वकील आहेत. अनेक खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. दहशतवादी कसाबविरुद्ध खटल्यात त्यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या

Aamir Khan : आमिर खानने कमबॅकबद्दल केलं मोठं वक्तव्य; म्हणाला,"अजून मानसिक तयारी झाली नाही"

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
कराडच्या मलकापूरमधील दांगट वस्तीत धक्कादायक घटना, महिलेवर कोयत्यानं हल्ला
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 14 February 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्सSolapur Garage Worker :आव्हानांचा वेढा, तरी MPSC त झेंडा;सोलापुरच्या बहिणींची यशोगाथा Special ReportZero Hour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीतून काय साध्य होणार?Thackeray-Pawar : टाळली भेट, सत्काराची मेख;ठाकरे-पवारांमधील दरी वाढतेय? Special Report Rajkiya Sholay

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
नियमानुसार 1400 कोटींच्या सफाईचं कंत्राट बेरोजगारांना देण्यात अडचण काय? हायकोर्टाचा महापालिकेला सवाल
कराड हादरलं.. 30 वर्षांच्या महिलेवर तरुणाकडून कोयत्यानं हल्ला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात नेलं
कराडच्या मलकापूरमधील दांगट वस्तीत धक्कादायक घटना, महिलेवर कोयत्यानं हल्ला
Beed Crime: बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम ॲक्टिव्ह, पोलिसांचं दुर्लक्ष; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
जे राहिलेत ते पण येतील, एकनाथ शिंदेचं मोठं वक्तव्य, पुढचा नंबर कोणाचा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Cidco My Homes Lottery : सिडकोच्या 26000 घरांची सोडत काही तासांवर, संगणकीय लॉटरी ड्रॉ कुठं पाहणार? सर्व माहिती एका क्लिकवर 
नवी मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण होणार, माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेची सोडत काही तासांवर, सर्व माहिती एका क्लिकवर 
   ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
  ... तर ठाकरे गटात एक माणूसही उरणार नाही, आदित्य ठाकरेंनी दमानं घ्यावं, प्रविण दरेकरांचा टोला
Maharashtra LIVE: महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष, ऑपरेशन टायगर जोरात, राज्यात नेमकं काय चाललंय?
Maharashtra LIVE: महाराष्ट्र काँग्रेसला मिळाला नवा प्रदेशाध्यक्ष, ऑपरेशन टायगर जोरात, राज्यात नेमकं काय चाललंय?
Samay Raina : समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
समय रैना हाजीर हो! पोलिसांनी दुसऱ्यांदा बजावले समन्स, 'या' तारखेला उपस्थित राहण्याचे आदेश
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.