एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Aamir Khan Viral Video : ''मिस्टर परफेक्शनिस्ट" चा व्हिडीओ व्हायरल; आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

Aamir Khan Viral Video : सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ प्रकरणी अभिनेता आमिर खानने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

Aamir Khan Viral Video : बॉलिवूडचा "मिस्टर परफेक्शनिस्ट" अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) पोलिसांत धाव घेतली आहे. एका व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा फेक असल्याचे आमिर खानने म्हटले आहे. 

प्रकरण काय?

सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओत आमिर खान एका विशष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसत आहे. त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आमिर खान करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

आमिर खानने काय म्हटले?

व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आमिर खानने आज एक अधिकृत निवेदन जारी केले. आमिर खानच्या टीमने त्याच्यावतीने निवेदनात म्हटले की,  आमिर खानने त्याच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन केले नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आमिरने निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. ज्यामध्ये आमिर एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ खोटा असून पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे आमिर खानने म्हटले. 

व्हायरल व्हिडीओबाबत आमिर खानने संबंधित अधिकाऱ्यांकडे, यंत्रणांकडे तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमकडेही तक्रार दाखल केली आहे. सायबर विभागाने एफआयआर दाखल केला आहे. 

आमिर खानचे आवाहन

आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसलो तरी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन आमिर खानने केले आहे. मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहनही आमिर खानने केले आहे. 

आमिरचे कोणते चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर?

आमिर खान हा सलाम वेंकी (Salaam Venky) या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. त्याशिवाय, सितारे जमीन पर या चित्रपटातही झळकणार आहे. आमिर खानची निर्मिती आणि किरण रावचे दिग्दर्शन असलेला लापता लेडीज हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. 
 
इतर संबंधित बातमी :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 RCB : आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
आरसीबीने तब्बल 119 कोटी खर्च करूनही लिलावात केली मोठी चूक; आता विराट कोहलीला निर्णय घ्यावाच लागणार!
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, महिलेने अधिकाऱ्याला काळं फासत दिला चांगलाच चोप, धुळ्यातील घटना
Ambadas Danve: लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
लोकसभेनंतर काँग्रेस नेत्यांचा अति आत्मविश्वास नडला, अंबादास दानवेंचं सूचक वक्तव्य, म्हणाले, स्वबळावर लढायचं तर..
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Embed widget