Aamir Khan Dangal : म्हारी छोरियाँ छोरों से कम हैं के? आमिर खानच्या 'दंगल'ची सहा वर्षे
Dangal : आमिर खानच्या बहुचर्चित 'दंगल' या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत.
Aamir Khan Dangal Six Years : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानचा (Aamir Khan) 'दंगल' (Dangal) हा सिनेमा जगभरात गाजला. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमाला आज सहा वर्षे झाली आहेत. 2016 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावर्षातील सर्वाधिक कमाई करणारा 'दंगल' सिनेमा होता.
पैलवान महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित या सिनेमात आमिर खान मुख्य भूमिकेत होता. सिनेमाचं कथानक आणि महावीर फोगाट यांच्या संघर्षाचं जागतिक स्तरावर कौतुक केलं गेलं. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी यांनी सांभाळली होती.
'दंगल' या सिनेमातील भूमिकेसाठी आमिर खानने सुमारे 90 किलोपर्यंत वजन वाढवलं होतं. महावीर फोगट यांनी आपल्या दोन कन्या गीता आणि बबिता कुमारी यांना कशाप्रकारे प्रशिक्षण दिले यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. या सिनेमात फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा या अभिनेत्रींनी अनुक्रमे गीता आणि बबिताची भूमिका साकारली होती.
'दंगल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यावेळी हा सिनेमा उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, छत्तीसगढ आणि मध्यप्रदेश या सहा राज्यांत करमुक्त जाहीर करण्यात आला होता. हा सिनेमा प्रेक्षकांसह समीक्षकांच्याही पसंतीस उतरला होता. या सिनेमान 741 कोटींची कमाई केली होती. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात या सिनेमाला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शक व सर्वोत्तम अभिनेता हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.
View this post on Instagram
'दंगल' या सिनेमातील कथानकासह या सिनेमातील गाणीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘हानिकारक बापू’ पासून ते अगदी ‘तेरी कहानी पग पग प्यारे’, ‘नैना..’ या सिनेमातील अनेक गाण्यांनी
प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्यावेळी भारतासह जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवणारा 'दंगल' हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला होता. चीनमध्ये या सिनेमाने सर्वाधिक कमाई केली होती.
संबंधित बातम्या
'दंगल'ची जगभरात 2000 कोटींची कमाई