एक्स्प्लोर

Aaliya Siddhiqui : "त्याच्या बोलण्यात तथ्य असतं तर..."; नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आरोपांवर आलियाचं उत्तर

Aaliya Siddhiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) मौन सोडल्यानंतर आलियाने पुन्हा त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Aaliya Siddhiqui On Nawazuddin Siddhiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddhiqui) सध्या चर्चेत आहे. पत्नी आलियाने (Aaliya Siddhiqui) नवाजुद्दीनवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्याने ट्वीट करत या आरोपांवर मौन सोडलं. आता आलिया पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. आलिया म्हणाली, "नवाज खरं बोलला असता तर त्याने न्यायालयात त्याचे बॅंक अकाऊंट स्टेटमेंट सादर केले असते". 

आलियाने लिहिलं आहे की, "नवाजच्या बोलण्यात तथ्य असतं, तो खरं बोलत असता तर त्याने न्यायालयात बॅंक अकाऊंट स्टेटमेंट सादर केले असते. पण त्याने कोणताही पुरावे सादर केलेला नाही. कारण मुलांसाठी पैसे खर्च केल्याचा पुरावा त्याच्याकडे नाही. नवाजने सादर केलेल्या पुराव्यांत 25 टक्के आरोपदेखील सिद्ध होत नाहीत". 

View this post on Instagram
 
A post shared by Aaliya Siddiqui (@aaliyanawazuddin)

आलियाने पुढे लिहिलं आहे, "नवाज एक जबाबदार वडील नाही. माझ्या नकळत तू माझ्या लेकीला तुझ्या मॅनेजरसोबत पाठवलं. त्यावेळी त्या अनोळखी व्यक्तीसोबत ती एका हॉटेलमध्ये एका रुममध्ये राहिली. त्यावेळी तुझ्या मॅनेजरने माझ्या लेकीच्या चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. तिचा विरोध असतानाही त्याने तिला मिठी मारली आणि त्यानंतरदेखील तू तुझ्या मॅनजरवर विश्वास ठेवलास. त्यानंतर मी जेव्हा या गोष्टीचा तुला जाब विचारला तेव्हा तू मुलांच्या कस्टडीसाठी केस केलीस." 

नवाजने काय आरोप केले होते? 

ट्वीट करत नवाज म्हणाला होता, "आरोपांवर काही बोलत नसल्याने मी वाईट झालो आहे. मुलांची शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी ती माझ्याकडून महिन्याला 10 लाख रुपये घेत आहे. त्याव्यतिरिक्त वेळोवेळी मी तिला आर्थिक मदत केली आहे. मुंबईत मी मुलांसाठी घेतलेलं घर तिने विकलं आणि दुसऱ्या एका घरात भाड्याने राहत आहे. मुलांसाठी घेतलेल्या गाड्यादेखील तिने विकल्या आहेत. आता फक्त पैशांसाठी ती माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे". 

आलियाने नवाजुद्दीनवर काय आरोप केले आहेत? 

नवाजुद्दीन मुलांना दूर करत असल्याचा आरोप आलियाने केला आहे. तसेच गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आता पुन्हा एकदा आलियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत. 

संबंधित बातम्या

Nawazuddin Siddiqui : आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीननं सोडलं मौन; ट्वीट शेअर करत म्हणाला, "ती माझ्याकडून महिन्याला..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Beed News: अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
अजित पवारांचा बीडमध्ये मोठा निर्णय, सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीमधून हटवलं
GBS Outbreak : पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगली जिल्ह्यातही जीबीएसचा शिरकाव; सहा रुग्णांना लागण
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
Embed widget