(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nawazuddin Siddiqui : आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीननं सोडलं मौन; ट्वीट शेअर करत म्हणाला, "ती माझ्याकडून महिन्याला..."
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने पोस्ट शेअर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तमाशा थांबवण्यासाठी मी मौन सोडत आहे, असेही नवाजुद्दीन म्हणाला.
Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. पत्नी आलियाने (Aaliya Siddhiqui) त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अखेर या आरोपांवर आता नवाजुद्दीन सिद्दीकीने ट्वीट करत मौन सोडलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीने लिहिलं आहे,"आरोपांवर काही बोलत नसल्याने मी वाईट झालो आहे. पण या सगळ्या गोष्टींचा माझ्या मुलांवर वाईट परिणाम होत आहे. आता हा तमाशा थांबवण्यासाठी मी मौन सोडत आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओंनी माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. काही मंडळी या गोष्टीची खूप आनंद घेत आहेत".
आरोपांवर व्यक्त होत नवाजुद्दीनने लिहिलं आहे,"मी आणि आलिया एकमेकांपासून विभक्त झालो आहोत. पण तरीही मुलांसाठी आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. माझी मुलं सध्या भारतात असून ते 45 दिवस त्यांच्या दुबईतील शाळेत गेले नसल्याने त्यांच्या शाळेतून मला रोज पत्रं येत आहेत. अनेक दिवस गैरहजर राहिल्याने त्यांच्या शालेय शिक्षणात अडचणी येऊ शकतात.
This is not an allegation but expressing my emotions. pic.twitter.com/6ZdQXMLibv
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) March 6, 2023
नवाजुद्दीन म्हणाला,"आलियाने माझ्या मुलांना चार महिन्यांपूर्वी दुबईत सोडलं होतं. शाळेची फी, वैद्यकीय खर्च आणि प्रवासासाठी ती गेल्या दोन वर्षांपासून माझ्याकडून महिन्याला 10 लाख रुपये घेत आहे. ती माझ्या मुलांची आई असल्याने तिच्या तीन सिनेमांसाठी मी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. वेळोवेळी तिला आर्थिक मदत केली आहे".
नवाजने पुढे लिहिलं आहे,"माझ्या मुलांना मी आलिशान गाड्या दिल्या होत्या. पण आलियाने त्या गाड्या विकल्या आणि ते पैसे स्वत:साठी खर्च केले. मुलांसाठी मुंबईतील वर्सोवा येथील एका अपार्टमेंटमध्ये मी घर घेतलं होतं. पण आलियाने ते घर विकलं आणि दुसऱ्या एका घरात ती मुलांसोबत भाड्याने राहत आहे. आलियाला फक्त पैशांची गरज आहे आणि पैशांसाठी तिने माझ्यावर वेगवेगळे आरोप केले आहेत".
नवाजुद्दीन मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. गैरवर्तन, जेवण न देणे, खोलीत बंद करणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलणे अशा अनेक आरोपांचा यात समावेश आहे. आलियाने सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ शेअर करत नवाज कसा वाईट आहे हे नेटकऱ्यांना सांगितलं आहे.
संबंधित बातम्या