एक्स्प्लोर

एआर रहमानची घटस्फोटाची घोषणा, टीममधील गिटारिस्ट तरुणीचाही पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय; वकिलाने सांगितलं दोघांचं कनेक्शन

AR Rahman Guitarist Mohini Dey Divorce : एआर रहमानने पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा करताच काही वेळाने टीममधील गिटारिस्ट तरुणी मोहिनी डे हिनेही घटस्फोटाची पोस्ट केली. याचं कनेक्शन वकील वंदना शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

AR Rahman Divorce : प्रसिद्ध भारतीय संगीतकार आर रहमान आणि सायरा बानो यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ए आर रहमान आणि सायरा बानो यांच्या वकील वंदना शाह यांनी एबीपी न्यूजशी खास संवाद साधला. वकील वंदना यांनी सांगितलं की, सामान्य लोकांप्रमाणेच प्रसिद्ध लोकांच्या घटस्फोटाची कारणेही कमी-अधिक प्रमाणात सारखीच असतात. एआर रहमान आणि सायरा बानो यांच्या विभक्त होण्याचं कारण विचारलं असता त्यांनी गोपनीयता बाळगणार असल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत.

एआर रहमानच्या घटस्फोटाचं मोहिनी डेशी कनेक्शन? 

वंदना यांनी सांगितलं की, ए आर रहमान आणि सायरा बानो यांचा अजून घटस्फोट झालेला नाही. पण, दोघांमधील मतभेद सोडवता न आल्याने त्यांना एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. वंदना शाह म्हणाल्या की, आम्ही फक्त आशा करू शकतो की, दोघांमधील सर्व मतभेद मिटतील आणि ते पुन्हा एकत्र येतील. एआर रहमानने पत्नी सायरा बानूपासून विभक्त होणार असल्याची घोषणा सोशल मीडिया पोस्टद्वारे करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता.

वकिल वंदना शाह सांगितलं सत्य

एआर रहमान आणि सायरा बानो यांच्यातील मतभेदामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप या जोडप्याला घटस्फोट झालेला नाही. पण, घटस्फोट झाल्यासे एआर रहमानला पत्नी सायराला पोटगी द्यावी लागेल. घटस्फोटानंतर पत्नीला मिळणारी आर्थिक भरपाई म्हणजे पोटगी अनेक घटकांवर अवलंबून आहे. एआर रहमान घटस्फोटानंतर सायरा बानोला किती पोटगी देणार हा ही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

गिटारिस्ट मोहिनी डेची घटस्फोटाची घोषणा

एआर रहमानने विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर, त्याच्या म्युझिक टीममधील गिटारिस्ट मोहिनी डे, हिनदेखील तिच्या पतीपासून वेगळं झाल्याची पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी एआर रहमान आणि मोहिनी डे या दोघांच्या घटस्फोटामधील कनेक्शन शोधण्यास सुरुवात केली आहे. नेटकऱ्यांनी दोघांचं नातं जोडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, वंदना यांनी या सर्व अफवा असल्याचं म्हणत या चर्चा फेटाळल्या आहेत.

घटस्फोट घेण्याच्या वाढत्या ट्रेंडचं कारण काय?

बॉलीवूड जोडप्यांमध्ये दीर्घकाळ वेळ घालवल्यानंतर वंदना शाह यांनीही घटस्फोट घेण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल सांगितलं. वंदना यांनी सांगितलं की, विवाहबाह्य संबंधांशिवाय एकमेकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण न करणे, वर्षानुवर्षे स्वतःची ओळख आणि अस्तित्व शोधणे, हे देखील घटस्फोट होण्यास कारणीभूत ठरत आहेत. सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्यातील घटस्फोटाची कारणे साधारणपणे सारखीच असतात, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

AR Rahman Guitarist Divorce : एआर रेहमानच्या गिटारिस्टनेही नवऱ्यापासून घेतला घटस्फोट, सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 04 February 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सSugarcane issue : ऊसाला तुरे, चिंतेचं गाळप; उत्पादन जवळपास २५ टक्क्यांनी घसरलं Special ReportABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 04 February 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्सMumbai Women Safety : मुंबईत महिला सुरक्षा वाऱ्यावर?पैशाचा तगादा लावल्यानं तरुणानं महिलेला संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
Eknath Shinde: देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी, नियोजित बैठकाही रद्द केल्या; राजकीय चर्चांना उधाण
Mumbai BMC Budget 2025:  पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
मुंबईकरांना नवा भुर्दंड, कचरा संकलन शुल्क लागणार? महापालिकेच्या बजेटमध्ये घोषणेची शक्यता
IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
कुस्तीच्या मैदानाचा नवा राजा; मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज मोहोळला खास 'शाबासकी'
Embed widget