एक्स्प्लोर

AR Rahman Guitarist Divorce : एआर रेहमानच्या गिटारिस्टनेही नवऱ्यापासून घेतला घटस्फोट, सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा

Mohini Dey Divource Announcement : संगीतकार एआर रहमानने घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर काही वेळातच त्याच्या टीममधील गिटारिस्टनेही तिच्या पतीपासून विभक्त झाल्याचं सांगितलं आहे.

Mohini Dey Announce Seperation : ऑस्कर विजेता लोकप्रिय संगीतकार ए आर रेहमान याने पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. ए आर रेहमानने लग्नाच्या 29 वर्षानंतर पत्नी सायरा बानूपासून घटस्फोट घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ए आर रेहमानने पत्नीपासून वेगळं होणार असल्याची घोषणा करताच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ए आर रेहमानने सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 

एआर रेहमानच्या गिटारिस्टनेही नवऱ्यापासून घेतला घटस्फोट

ए आर रेहमान सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपण पत्नी सायरापासून विभक्त झाल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं की, 'या नात्यात 30 वर्षे घालवू असं वाटलं होतं पण तसं झालं नाही'. या घोषणेच्या अवघ्या काही तासांनंतर, त्यांच्या ग्रुपमधील गिटार वादक मोहिनी डे हिने पतीपासून घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. नेटकरी या घटस्फोटाकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले आहेत आणि सोशल मीडियावर यावर प्रतिक्रिया देत आहेत.

सोशल मीडियावर विभक्त झाल्याची घोषणा

एआर रेहमाननंतर गिटारिस्ट मोहिनी डे आणि तिचा पती मार्क यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची घोषणा केली आहे. या दोघांनीही इंस्टाग्रामवर एक संयुक्त निवेदन जारी करत लिहिलं आहे, "माझे प्रिय मित्र, कुटुंब, चाहते आणि फॉलोअर्स. जड अंतःकरणाने, मार्क आणि मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे नातं आम्ही परस्पर संमतीने आणि समजुतीने संपवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच चांगलं मित्र राहू. आम्ही ठरवलं आहे की, आमच्या आयुष्यात गोष्टी वेगळ्या आहेत आणि परस्पर संमतीने आम्ही वेगळे झालो आहोत".

कोण आहे मोहिनी डे?

मोहिनी डे ही  मूळची कोलकाताची आहे आणि एक बास गिटार प्लेअर आहे. ती गान बंगालच्या विंड ऑफ चेंजचा भाग आहे. मोहिनी डे संगीतकार एआर रेहमानच्या टीमचाही एक भाग आहे. तिने ए आर रेहमानसोबत जगभरात 40 हून अधिक शो-कॉन्सर्ट केले आहेत. मोहिनी डेने ऑगस्ट 2023 मध्ये स्वतःचा पहिला अल्बम देखील रिलीज केला आहे.

मोहिनी डेची पोस्ट चर्चेत

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohini Dey (@dey_bass)

29 वर्षानंतर ए आर रेहमानचा घटस्फोट

ए आर रेहमानने लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. एआर रेहमान आणि सायरा बानो यांनी 1995 मध्ये लग्न केलं. या जोडप्याला खतिजा, रहीमा आणि आमीन अशी तीन मुले आहेत. तिन्ही मुले विवाहित आहेत. काळासोबत नात्यात तणाव वाढत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Salman Khan Security : सलमान खानची सुरक्षा व्यवस्था पाहून लॉरेन्स बिश्नोईलाही फुटेल घाम; ड्रोन, कमांडो अन् बॉडीगार्ड

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Atul: बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
बापाच्या सुरांनी महाराष्ट्र वेडावला, आता लेक काळजात घर करणार! अतुल यांच्या मुलाची 'राजा शिवाजी'च्या अँथम साँगमध्ये दिसली पहिली झलक
Bharat Ganeshpure: 'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
'भोंदू बाबा म्हणतो, दुनिया झुकती हैं; झुकानेवाला....' अशोक खरात प्रकरणात 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे काय म्हणाले?
Matka King: सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
सिद्धार्थ जाधवची नागराज मंजुळेंसाठी खास पोस्ट, भावुक होत म्हणाला, माझ्या आयुष्यातली पहिली वेब सिरीज...
Patralekha: आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..
आई झाल्यानंतर अभिनेत्रीचं वाढलं वजन, बॉडी शेमिंगमुळे ट्रोल; Actress ने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली..

व्हिडीओ

Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget