83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
83 World Television Premiere : '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर स्टार गोल्डवर होणार आहे.
83 World Television Premiere : रणवीर सिंहचा (Ranveer Singh) '83' सिनेमा प्रेक्षकांना आता घरबसल्या पाहता येणार आहे. 20 मार्चला रविवारी रात्री आठ वाजता स्टार गोल्डवर '83' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.
चांगली कथा, उत्तम कलाकार असूनदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. कोरोनाचा '83' च्या कमाईवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे लवकरच हा सिनेमा ओटीटीवरदेखील प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आता हा सिनेमा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
'83' सिनेमाचे कथानक 1983 च्या क्रिकेट विश्वचषकाच्या विजयावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खानने केले आहे. सिनेमात रणवीर सिंहने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर सिनेमात दीपिका पदुकोण, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, साकिब सलीम, हार्डी संधू, ताहिर राज भसीन, जतीन सरना मुख्य भूमिकेत आहे. कपिल यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली आहे.
संबंधित बातम्या
83 World Television Premiere : 'जीतेगा जीतेगा, इंडिया जीतेगा', 'या' दिवशी होणार '83' चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर
Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा', स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई
Jhund Box Office Collection Day 2 : ‘झुंड’ची यशस्वी घौडदौड सुरूच! दुसऱ्या दिवशीही गाठला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha