Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' ते 'नीरजा', स्त्रीप्रधान सिनेमांनी जिंकली प्रेक्षकांची मने, बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींहून अधिक कमाई
Women Centric Films : 'गंगूबाई काठियावाडी' सारख्या स्त्रीप्रधान सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
Women Centric Films : अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरदेखील त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. 'गंगूबाई काठियावाडी'पासून 'नीरजा'पर्यंत अनेक स्रीप्रधान सिनेमांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
गंगूबाई काठियावाडी : आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. या सिनेमाने जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
View this post on Instagram
तनु वेड्स मनु रिटर्न्स : कंगना रनौतचा 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमाने जगभरात 255.3 कोटींची कमाई केली होती.
स्त्री : श्रद्धा कपूरच्या 'स्त्री' सिनेमाचे प्रचंड कौतुक झाले होते. या सिनेमाने 130 कोटींची गल्ला जमवला होता.
राजी : आलिया भट्टच्या 'राजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली होती. या सिनेमाने जवळपास 195 कोटींची कमाई केली होती.
नीरजा : सोनम कपूरने 'नीरजा' सिनेमात केबिन क्रू मेंबर नीरजा भानोतची भूमिका साकारली होती. हा सिनेमा नीरजा भानोतच्या आयुष्यावर भाष्य करणारा होता. सोनम कपूरला या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाने जगभरात 131 कोटींची कमाई केली होती.
संबंधित बातम्या