ड्रग्सच्या व्यसनामुळे संजय दत्तने गमावला होता 'हा' सिनेमा, 'या' हिरोला मिळाली संधी
संजय दत्तला ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवण्यात आलं होतं. संजय दत्तच्या याच सवयीमुळे त्याच्या हातून अनेक सुपरहिट सिनेमे निसटले.
मुंबई : संजय दत्त बॉलिवूडमधील मोठं नाव. संजय दत्तची स्टाईल, अॅक्टिंगचे अनेक चाहते आहे. संजय दत्तने त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे केलं. प्रेक्षकांनी संजय दत्तला अक्षरश: डोक्यावर बसवलं. मात्र संजय दत्तच्या सिनेकिर्दिपेक्षा वैयक्तिक आयुष्याची जास्त चर्चा आजवर झाली आहे. संजय दत्त ड्रग्सच्या आहारी गेला होता हे आता जगजाहीर आहे. त्याचं हे ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला व्यसनमुक्ती केंद्रातही पाठवण्यात आलं होतं. संजय दत्तच्या याच सवयीमुळे त्याच्या हातून अनेक सुपरहिट सिनेमे निसटले.
1980 मध्ये सुभाष घई यांच्या 'हिरो' सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. सुभाष घई या सिनेमात संजय दत्तला घेऊ इच्छित होते. संजय दत्तची अॅक्टिंग सुभाष घई यांना आवडली होती. यामुळे सुभाष घई यांनी संजय दत्तला विधाता आणि हिरो सिनेमासाठी साईन केलं होतं. मात्र दरम्यान संजय दत्त ड्रग्सच्या विळख्यात अडकला होता. ज्यावेळी सुभाष घई यांनी विधाता सिनेमाची शुटिंग सुरु केली त्यावेळी संजय दत्त नेहमी सेटवर उशीरा येत असे. विधाता सिनेमाची शुटिंग कशीबशी सुभाष घई यांनी पूर्ण केली मात्र हिरो सिनेमात संजय दत्तला न घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर काय घडलं हे सर्वांनाच माहिती आहे. सुभाष घई यांनी हिरो सिनेमासाठी जॅकी श्रॉफला साईन केलं. या सिनेमामुळे जॅकी श्रॉफला बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळाली. प्रेक्षकांना जॅकी श्रॉफची अॅक्टिंग खुप आवडली. हिरो सिनेमातील गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहे. मात्र हिरो सिनेमा गमावल्याचं दु:ख संजय दत्तला नक्कीच असेल, यात शंका नाही.