Bollywood Actress Struggle Life: अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण, प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी पहिली बॉलिवूड सेलिब्रिटी, अब्जाधीश आहे 'ही' अभिनेत्री
Bollywood Actress Struggle Life: अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आणि प्रायव्हेट आयलँड खरेदी करणारी ही अभिनेत्री, मूळात भारतातील नाही, तर ती मूळची श्रीलंकेची आहे.

Bollywood Actress Struggle Life: एक काळ होता, हिरोमुळे म्हणजेच, सिनेमातल्या अभिनेत्यामुळे (Bollywood Actor) फिल्म चालायची. पण, आज बॉलिवूड इंडस्ट्रीवर चक्क अभिनेत्रींचं राज्य आलं आहे. कोणत्याही फिल्मसाठी बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षा बॉलिवूडच्या अभिनेत्री (Bollywood Actress) जास्त मानघन घेतात. अनेक अभिनेत्री आता एखाद्या फिल्मसाठी कोट्यवधींचं मानधन घेतात. अनेक अभिनेत्रींनी आपल्या मेहनतीच्या जीवावर कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं आहे. या इंडस्ट्रीमध्ये यश मिळवणाऱ्यांच्या यादीत नोरा फतेही (Nora Fatehi), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) अशा अनेक परदेशी अभिनेत्रींची नावं देखील आहेत, ज्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये (Hindi Movies) आपलं नशीब आजमावलं आणि उत्तम स्टारडम मिळवलं. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिच्याकडे केवळ एक खाजगी जेट, एक आलिशान बंगला आणि लक्झरी कारचा ताफाच नाही तर तिच्याकडे एक प्रायव्हेट आयलँड (Private Island) देखील आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीबाबत बोलत आहोत, ती मूळात भारतातील नाही, तर ती मूळची श्रीलंकेची आहे. तिचं नाव आहे, जॅकलिन फर्नांडिस. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तब्बल दोन दशकांहून अधिक काळ भारतीय मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. 2009 मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'अलादीन' या चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारी जॅकलिन फर्नांडिस ही एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिच्याकडे स्वतः एक खाजगी बेट आहे. जॅकलिन फर्नांडिस ही श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील चार एकर बेटाची मालकीण आहे, हे बेट तिनं 2012 मध्ये खरेदी केलं होतं.
जॅकलिन फर्नांडिसला स्वतःच्या प्रायव्हेट आयलँडवर बांधायचाय आलिशान बंगला
मीडिया रिपोर्टनुसार, जॅकलिन फर्नांडिसनं प्रायव्हेट आयलँड खरेदी करण्यासाठी तब्बल 600000 डॉलर (त्यावेळी जवळपास 3 कोटी रुपये) खर्च केले होते. एका जुन्या मुलाखतीत बोलताना अभिनेत्रीनं कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेल्या प्रायव्हेट आयलँडवर एक आलिशान बंगला बांधण्याची इच्छा व्यक्त केली होती. अशातच, जॅकलीन जो बंगला बांधणार आहे, तो स्वतःसाठी बांधणार की, त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणार? याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती. दरम्यान, जॅकलीननं प्रायव्हेट आयलँड खरेदी केल्यानंतर तिथे काय केल? याबाबत आणखी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
जॅकलिन फर्नांडिसचं नेटवर्थ किती माहितीय?
जॅकलिन फर्नांडिसनं तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'अलादीन' सिनेमातून केली होती, पण तिला खरी ओळख, 2011 मध्ये आलेल्या 'मर्डर 2'मधून मिळाली. आतापर्यंतच्या तिच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत, जॅकलिन फर्नांडिसनं अनेक सुपरस्टार्ससोबत काम केलं, ज्यात अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद यांसारख्या अनेक सुपरस्टार्सचा समावेश आहे. आज, जॅकलिन फर्नांडिसची एकूण संपत्ती 115 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























