(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonu sood | सोनू सूद कोरोना निगेटीव्ह; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणितक वाढत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र आहे.
Sonu sood देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोना रुग्णसंख्या अतिशय झपाट्यानं वाढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या या लाटेत बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटपटूंनाही या विषाणूची लागण झाली. अभिनेता सोनू सूदही त्यापैकीच एक.
अनेक स्थलांतरित मजुरांना कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांच्या मूळ गावी पोहोचण्यास मदतीचा हात देणाऱ्या सोनू सूद यानं काही दिवसांपूर्वीच आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. चाहत्यांना याची माहिती मिळताच अनेकांनीच सोनूच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. सेलिब्रिटी आणि चाहत्यांमधील एक वेगळंच नातं इथे पाहायला मिळालं.
पण, आता मात्र सोनू सूदच्या चाहत्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण कोरोना संसर्गातून तो मुक्त झाला आहे. खुद्द सोनू सूद यानंच ट्विट करत याबाबतची माहिती चाहत्यांना दिली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आल्याचा इशारा करत सोनूनं ही आनंदवार्ता सर्वांशीच शेअर केली.
Tested: COVID-19 Negative. pic.twitter.com/wF61zXVJ6m
— sonu sood (@SonuSood) April 23, 2021
कोरोनाच्या पहिल्या लाटेत, म्हणजेच मागच्या वर्षी असंख्य स्थलांतरित मजुरांना स्वगृही पाठव्यात सोनूनं मोलाचं योगदान दिलं होतं. यंदाच्या वर्षी तो औषधं, बेड्स या रुपानं कोरोनाबाधितांच्या मदतीला धावून आला आहे. असा हा अभिनेता कोरोना संसर्गाच्या संकटापासून दूर गेल्यामुळं त्याच्या हितचिंतकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.