Bollywood Actor Life Story: वडिलांचं ऐकलं असतं, तर आज टेलर बनला असता 'हा' सुपरस्टार; पण, नशीब पालटलं अन् बॉलिवूडला गवसला 'मास्टर गोगो'
Bollywood Actor Life Story: सत्तरी पार केलेल्या या अभिनेत्यानं 1977 मध्ये 'खेल खिलाडी' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

Bollywood Actor Life Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) नशीब आजमावण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. अनेकजण यात यशस्वी होतात, पण काहीजण खचता खात राहतात. बॉलिवूडमध्ये चमकणं तसं फार सोपं नाही. पण, ज्यांना इंडस्ट्रीत यशाचा मार्ग गवसला, त्यांच्यासाठी इथे टिकून राहणं फार सोपं नव्हतं. फोटोमध्ये डावीकडे दिसणारा मुलगा यापैकीच एक, पण त्याची इंडस्ट्रीत येण्याची काहीच योजना नव्हती. खरं तर याच्या वडिलांना त्याला हातात सुई, धागा देऊन शिंपी बनवायचं होतं. पण, देवानं मात्र त्याच्या नशीबात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं. पण, हातात सुई, धागा घेण्याऐवजी हा मुलगा बॉलिवूडमध्ये आला आणि गुन्हेगारीचा मास्टर गोगो बनला. तुम्ही ओळखता का या अभिनेत्याला?
फोटोत दिसणारा हा गोंडस मुलगा दुसरा, तिसरा कुणी नसून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते शक्ती कपूर (Shakti Kapoor) आहेत. सत्तरी पार केलेल्या या अभिनेत्यानं 1977 मध्ये 'खेल खिलाडी' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या पालकांनी त्यांचं नाव सुनील सुंदरलाल कपूर ठेवलेलं. दरम्यान, त्यानं चित्रपटांसाठी आपलं नाव बदललं, कारण इंडस्ट्रीमध्ये या नावाचे दोन सुपरस्टार आधीच होते. शक्ती कपूरच्या वडीलांना त्यांना शिंपी बनवायचं होतं. पण, त्यांच्या नशीबात मात्र वेगळंच लिहिलं होतं. वडिलांना मात्र त्यांचं इंडस्ट्रीत काम करणं मान्य नव्हतं. इंडस्ट्रीत आल्यानंतर त्यांच्या नशीबी खलनायकाच्या भूमिका आल्या. पण, त्यांनी पडद्यावर खलनायक साकारणं त्यांच्या आईला मान्य नव्हतं. त्यांचा 'इन्सानियत का दुश्मन' हा चित्रपट पाहिल्यानंतर, त्यांची आई चित्रपट सुरू असताना मधूनच थिएटरमधून निघून गेलेली आणि नंतर ती शक्ती कपूरवर प्रचंड रागावली.
View this post on Instagram
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगी बनलीय सुपरस्टार
शक्ती कपूर स्वतः फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहेतच, पण आता वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलगीसुद्धा सुपरस्टार बनलीय. प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ देखील तिची बरोबरी करू शकली नाही. आपण श्रद्धा कपूरबद्दल बोलत आहोत. तिनं 2010 मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटातून पदार्पण केलं, ज्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. दरम्यान, तिला 'आशिकी 2' चित्रपटातून खरी ओळख मिळाली, ज्यासाठी तिला बिग स्टार एंटरटेनमेंट पुरस्कार देखील मिळाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























