एक्स्प्लोर

सुकेश चंद्रशेखरकडून मिळालेल्या गिफ्टमुळं बॉलिवूडच्या 15 नायिका रडारवर, ईडीकडून चौकशीची शक्यता

बॉलिवूड कलाकारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनंतर आता बॉलिवूडचे कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत.


मुंबई : सुकेश चंद्रशेखरमुळे शिल्पा शेट्टी, श्रद्धा कपूरही ईडीच्या रडारवर आले आहेत. सुकेशकडून महागडं गिफ्ट घेतलेल्या 15 अभिनेत्रींवर ईडीची नजर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेशच्या चौकशीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावं समोर आल्याची माहिती मिळत आहे. याआधी जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीची ईडीकडून चौकशी झाली होती.

बॉलिवूड कलाकारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरूच आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनंतर आता बॉलिवूडचे कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत.  या यादीमध्ये बॉलिवूडमधील काही मोठी नावे समोर आली. अशाप्रकारे एकूण 15 कलाकारांची नावे ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुकेशकडून त्यांनी अतिशय महागडे गिफ्ट घेतले असून अशा 15 अभिनेत्रींवर ईडीची नजर आहे. दोनशे कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणी  सुकेशला ईडीने  अटक केली आणि या पैशांचा वापर  सुकेशने हे महागडे गिफ्ट देण्यासाठी केला असल्याचा संशय ईडीला आहे.

रॅनबॅक्सीचे प्रवर्तक शिवेंद्र सिंह यांची पत्नी आदिती सिंह यांनी आरोप लावले होते की, त्यांचे पती तुरुंगात असताना सुकेशचंद्राने जामीन मिळवून देण्यासाठी सरकारी अधिकारी असल्याचा भासवून त्यांच्याकडून 200 कोटी रुपये उकळले होते.  सुकेशचंद्र तुरुंगात बसून खंडणीचा रॅकेट चालवत होता.

नोरा फतेही 

सुकेशने नोरा फतेहीला एक आलिशान बीएमडब्ल्यू कार, आयफोन आणि एक कोटी रुपये दिल्याचे ईडीला आढळले. इतकंच नाही तर दोघांचे चॅटही समोर आले आहेत.  "ती खूप आवडत असल्याने तिला महागडे गिफ्ट दिल्याचे सुकेशने ईडीला सांगितले"


जॅकलीन फर्नांडिस 

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची ईडीने कसून चौकशी केली होती. सुकेश चंद्रशेखरने तिला अतिशय महागडे गिफ्ट दिले होते.

शिल्पा शेट्टी 

चौकशीदरम्यान सुकेशने शिल्पा शेट्टीचा उल्लेख केला. तिचा पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात अडकल्यानंतर सुकेशने तिला संपर्क केला होता. शिल्पा ही त्याची मैत्रिण असून जामिनासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली होती

श्रद्धा कपूर 

अभिनेता सुशांत राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात एनसीबीने अंमली पदार्थांच्या चौकशीसाठी तिला बोलवले होते. तिला या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती, असे सुकेशने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. या अभिनेत्रींसह हरमन बावेज या अभिनेत्याचेही नाव घेतलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात आणखीन कुठले कलाकार ईडीच्या रडारवर येत आहेत ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.  मात्र या कारवाईमुळे बॉलीवूड पुन्हा हादरलं आहे एवढ मात्र निश्चित आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

Aishwarya Rai ED Summoned : ऐश्वर्या राय-बच्चन चौकशीसाठी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर

 

महत्त्वाच्या बातम्या

Ajinkya Deo on Alka Kubal: 'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
'अलका कुबलने जत्रेत जाऊन स्वत:चे चित्रपट चालवले'; अजिंक्य देव यांनी सांगितला किस्सा, त्यांची आवडती अभिनेत्री कोण?
Mahesh Babus Nephew Marriage: महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
महेश बाबूच्या घरी कोरियाची सूनबाई; व्हिएतनाममध्ये शाही लग्नसोहळा पार पडला, जोडप्याचे सुंदर PHOTOS व्हायरल
Yetech Aata Mi Naandayla: '50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
'50 ATKT अन् गावभर लागले नापासाचे होर्डिंग्ज' अभिनेता हर्षद अतकारीने सांगितला मजेशीर किस्सा
Kedar Shinde on Kombdi Palali: 'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा
'कोंबडी पळाली' गाणं शूटसाठी माझ्याकडे नव्हते पैसे, भरत मदतीला धावला, तुफान नाचला; केदार शिंदेंनी सांगितला भन्नाट किस्सा

व्हिडीओ

No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Crime News : वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
वसईत बहिणीनेच भावाला चाकूने भोसकून संपवलं; घरात घेण्याच्या वादातून थरार, आरोपी ताब्यात
Parliament Session : 30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
30 नोव्हेंबर रोजी लोकसभा, तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे अधिवेशन; मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारकडून मोठ्या हालचाली
Packaged Food Label : पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
पॅकेटबंद खाद्यपदार्थांवर 'हाय फॅट, शुगर, सॉल्ट'चा इशारा देणारा षटकोन छापा, सुप्रीम कोर्टाचे FSSAI ला मोठे निर्देश
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
तलाठी कार्यालयात घुसून वाळू माफियाचा तलाठ्यावर हल्ला; रुग्णालयात उपचार सुरू, कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाचा इशारा
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष बदलल्या; रोहिणी खडसेंच्या जागी अंजली साळवे, कोण आहेत नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष
Sharankumar Limbale : बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
बेळगाव पाकिस्तानात आहे का? मराठी बोलणारं सगळं जग महाराष्ट्रात आणणार का? साहित्य संमेलन अध्यक्षांची मुक्ताफळे, सीमाभागातील जनतेच्या जखमेवर मीठ
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
ही बाब मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी; रोहित पाटलांची टीका, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मैदानात
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
महाबीजमध्ये 35 वर्षांपासून काम करणाऱ्या 26 कामगारांना थेट कामावरुन काढले, कामगारमंत्र्यांच्या जिल्ह्यातच अन्याय
Embed widget