Bodybuilder Varinder Ghuman Died: मित्राच्या निधनाची 'ती' पोस्ट अखेरची ठरली; शस्त्रक्रिया सुरू असतानाच बॉलिवूड अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका, 'टायगर 3' फेम अभिनेत्याचं निधन
Bodybuilder Varinder Ghuman Died: शस्त्रक्रियेदरम्यानच वरिंदर सिंहला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. वरिंदरनं 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान स्टारर 'टायगर 3' मध्ये काम केलंल.

Bodybuilder Varinder Ghuman Died: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा को-अॅक्टर बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमनचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असून ते 53 वर्षांचे होते. वरिंदरच्या निधनानं पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वरिंदर अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात आलेला. त्याची एक छोटीशी शस्त्रक्रिया होती आणि त्याच दिवशी त्याला डिस्चार्ज दिला जाणार होता. पण, शस्त्रक्रियेदरम्यानच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. वरिंदरनं 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान स्टारर 'टायगर 3' मध्ये काम केलंल.
वरिंदर सिंहच्या मृत्यूचं कारण काय?
बॉडीबिल्डर वरिंदर सिंह घुमन एका मायनर ऑपरेशनसाठी अमृतसरच्या फोर्टिस रुग्णालयात आलेले. शस्त्रक्रिया छोटीशी आणि अगदी मायनर असल्यामुळे तो एकटाच रुग्णालयात आलेला. त्याला ऑपरेशननंतर काही तासांतच डिस्चार्जही दिला जाणार होता. पण, अचानक शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.
ਪੰਜਾਬ ਦੇ ਮਸ਼ਹੂਰ ਬਾਡੀਬਿਲਡਰ ਤੇ ਅਦਾਕਾਰ ਵਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਘੁੰਮਣ ਜੀ ਦੇ ਅਚਾਨਕ ਦੇਹਾਂਤ ਦੀ ਖ਼ਬਰ ਸੁਣ ਕੇ ਦਿਲ ਬਹੁਤ ਦੁਖੀ ਹੈ।
— Sukhjinder Singh Randhawa (@Sukhjinder_INC) October 9, 2025
ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਸਖ਼ਤ ਮਿਹਨਤ, ਅਨੁਸ਼ਾਸਨ ਤੇ ਕਾਬਲੀਅਤ ਨਾਲ ਪੰਜਾਬ ਦਾ ਨਾਮ ਦੁਨੀਆ ਭਰ ‘ਚ ਰੌਸ਼ਨ ਕੀਤਾ।
ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਆਤਮਾ ਨੂੰ ਚਰਣਾਂ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਬਖ਼ਸ਼ਣ ਤੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਇਹ ਦੁਖਦਾਇਕ ਭਾਣਾ… pic.twitter.com/ZVQHUNWVf6
वरिंदर सिंह घुमन कोण?
वरिंदर सिंह घुमन भारताचा पहिला वेजेटेरियन प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि अभिनेता होता. घुमनने 2009 मध्ये मिस्टर इंडियाचा खिताब जिंकलेला आणि त्याला मिस्टर एशियामध्ये दुसरं स्थान मिळालेलं. त्यानं 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'कबड्डी वन्स मोर' सिनेमातून पंजाबी फिल्म्समधून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यानं 'रोर: टाइगर्स ऑफ द सुंदरबन्स' (2014) आणि 'मरजावां' (2019) यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलंय.
मित्राच्या निधनाची पोस्ट ठरली शेवटची
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध पंजाबी गायक राजवीर जवंदा यांचं निधन झालंय. अपघातात जखमी झालेल्या राजवीरवर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती खालावत गेली आणि त्याचं निधन झालं. राजवीर हा वरिंदर सिंह घुमनचा चांगला मित्र होता. वरिंदरनं राजवीरसाठी श्रद्धांजलीची पोस्ट केली होती. पण नेमकी त्याची हीच शेवटची पोस्ट ठरली.






















