(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss OTT 3 Grand Finale : वादंगानंतर बिग बॉस ओटीटीच्या अंतिम सोहळ्याची तारीख जाहीर? कार्यक्रम बंद करण्याचं कारण आलं समोर
Bigg Boss OTT 3 Grand Finale : बिग बॉस ओटीटीचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार असून यंदाच्या सिझनचा विजेता कोण असणार याची उत्सुकता आता काही दिवसांतच संपणार आहे.
Bigg Boss OTT 3 Grand Finale : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT Season 3) हा कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून बराच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांचे वाद, त्याचे बाहेर उमटणारे पडसाद या सगळ्यांमुळे बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून बराच चर्चेत आहे. घरातील स्पर्धकांची भांडणं, अनिल कपूरने घरातल्यांची घेतलेली शाळा या सगळ्यामुळे हा सिझन विशेष चर्चेत राहिला. पण आता लवकरच हा सिझन प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
बिग बॉस ओटीटीचं पर्व हे 21 जून रोजी सुरु झालं. त्यानंतर आता येत्या 4 ऑगस्ट रोजी या सिझनचा अंतिम भाग प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आता येत्या 2 ऑगस्ट रोजी या सिझनचा अंतिम सोहळा प्रदर्शित होणार आहे.
कोण होणार बिग बॉस ओटीटी 3चा विजेता?
येत्या 2 ऑगस्ट रोजी बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले होणार आहे.आतापर्यंत लोकांना वाटत होते की विशाल पांडे टॉप-5 मध्ये येईल पण तसे झाले नाही. आता लवकेश कटारिया विजयी होण्याची अपेक्षा आहे. कारण ज्याचे मतदान जास्त असेल तोच विजयी होईल. एल्विश यादवमुळे लवकेश कटारिया विजयी होऊ शकतो. रणवीर शौरी उपविजेता ठरू शकतो. पण निर्माते काय ट्विस्ट आणतात हे पाहणे बाकी आहे.
बिग बॉस ओटीटी चर्चेत
काही दिवसांपूर्वी घरातील दोन स्पर्धक क्रितिका आणि अरमान मलिक यांचा एक अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यावर आमदार मनिषा कायंदे यांनी तक्रार केली होती. पण व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा फेक असल्याचं जिओ सिनेमाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं.
'खतरों के खिलाडी 14' होणार सुरु
खतरों के खिलाडी 14 येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे ओटीटीवर कोणताही स्लॉट रिकामा नाही. म्हणूनच हा बिग बॉस ओटीटीचा अंतिम सोहळा यंदा शनिवार किंवा रविवारी नाही तर शुक्रवारी ठेवण्यात आला आहे. कोणत्या वेळी हा अंतिम सोहळा सुरु होणार याबाबत अद्याप कोणताही माहिती देण्यात आलेली नाहीये. पण संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.