Bigg Boss OTT Season 3 : अरमान आणि क्रितिकाच्या 'त्या' व्हिडीओवर जीओ सिनेमाचं स्पष्टीकरण, खोटा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा
Bigg Boss OTT Season 3 : बिग बॉस ओटीटीवरुन सध्या बराच वादंग निर्माण झाला आहे. त्यावर आता जीओ सिनेमाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय.
![Bigg Boss OTT Season 3 : अरमान आणि क्रितिकाच्या 'त्या' व्हिडीओवर जीओ सिनेमाचं स्पष्टीकरण, खोटा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा JioCinema explaination on Armaan Malik and kritika Viral Video from Bigg Boss OTT Season 3 Bigg Boss OTT Season 3 : अरमान आणि क्रितिकाच्या 'त्या' व्हिडीओवर जीओ सिनेमाचं स्पष्टीकरण, खोटा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/23/3f6cabfc15f74f4f92e9b2e0a84dc8ce1721735715657720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bigg Boss OTT Season 3 : जीओ सिनेमावर (Jio Cinema) सुरु असलेल्या बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT Season 3) हा कार्यक्रम सध्या वादग्रस्त चर्चेत आहे. आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी या कार्यक्रमाच्या विरोधात तक्रार करत शो बंद करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसांनी पत्रक देखील दिलं होतं. यावर आता जीओ सिनेमाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी जीओ सिनेमावर स्ट्रीम होणाऱ्या बिग बॉस मराठी ओटीटी या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले क्रितिका आणि अरमान मलिक यांचा हा अश्लील व्हिडीओ असल्याचं समोर आलं. त्यामुळे हा कार्यक्रम तातडीने बंद करण्याची मागणी सध्या होत आहे.
जीओ सिनेमाकडून आलं स्पष्टीकरण
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा बिग बॉस ओटीटीचा नसल्याचं जीओ सिनेमाचं म्हणणं आहे. खरा व्हिडीओ कुणीतरी एडिट केल्याचंही जीओ सिनेमाचं म्हणणं आहे. तसेच हा चुकीचा व्हिडीओ व्हायरल करण्याण्यावर कारवाई देखील करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, 'जीओ सिनेमावर जो कंटेट प्रदर्शित केला जातो, त्यासाठी बरीच मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्याचप्रमाणे बिग बॉस ओटीटी ही जीओ सिनेमावर प्रसारित करण्यात येते आणि यामध्ये कोणताही अश्लील कंटेट नव्हता. व्हायरल क्लिपमध्येच खऱ्या व्हिडीओसोबत अफरातफर करण्यात आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारे बनावट क्लिप तयार करुन ती सोशल मीडियावर व्हायरल करणं ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे.'
नेमकं प्रकरण काय?
छोट्या पडद्यावर बिग बॉस या रिएल्टी शोला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर खास ओटीटीवरील प्रेक्षकांसाठी बिग बॉस ओटीटीचा सीझन सुरू करण्यात आला. यंदाच्याही सीझनमध्ये सेलिब्रिटींसोबत सोशल मीडिया इन्फ्लूएंजर स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच अरमान मलिक आणि त्याची दुसरी पत्नी कृतिका यांच्यातील कथित आक्षेपार्ह कृतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चांना उधाण आले होते. नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या घरातील असे कृत्य दाखवल्याने नाराजी व्यक्त केली होती.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)