एक्स्प्लोर

अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी 'मी सावित्रीबाई ..' मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी ज्योतिरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडून स्त्री शिक्षणाची सुरुवात, चौकटी मोडण्याचा धैर्य वाखाणण्याजोगं आहे .

Mi Savitribai Jyotirao Phule: स्टार प्रवाहवरील ' मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ' ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेविषयी एकच चर्चा सुरू आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित या मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर या दोघांच्या ऐवजी प्रमुख भूमिकेत अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री राजश्री भावे दिसत असल्याने अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांनी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका सोडली की काय ? अशा चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावरही सावित्री -ज्योती ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. पण अमोल आणि मधुराणी या कलाकारांनी खरंच मालिका सोडली आहे का? याविषयी सत्य समोर आले आहे. (Amol Kolhe Madhurani Prabhulkar)

मालिकेच्या या टप्प्यात समाजातील रूढी परंपरांची आव्हान आणि सावित्रीबाईंनी शिकावं स्वावलंबी व्हावे यासाठी ज्योतिरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी ज्योतिरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडून स्त्री शिक्षणाची सुरुवात, चौकटी मोडण्याचा धैर्य वाखाणण्याजोगं आहे . नव्या पिढीसाठी मालिकेतील हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे.

अमोल कोल्हे -मधुराणी प्रभुलकर यांनी मालिका सोडली का ?

स्टार प्रवाहवरील 'मी सावित्री ज्योतीराव फुले ' या मालिकेत आता काही वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची भूमिका मधुराणी आणि अमोल कोल्हे नाही तर दोन तरुण कलाकार ही भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर करत सावित्री ज्योती ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची घोषणा करण्यात आली. ही भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री राजश्री भावे साकारणार आहेत. सावित्री आणि ज्योतीरावांच्या तरुणपणीच्या भूमिकेत अभिषेक आणि राजश्री यांची जोडी दिसणार आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि राजश्रीचे फोटो व्हायरल होत असल्याने मधुराणी आणि अमोल यांनी मालिका सोडल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या.मात्र यात काहीही तथ्य नाही. अभिषेक आणि राजश्री सावित्रीबाई आणि ज्योतीराव यांच्या तरुणपणीचे भूमिका साकारणार आहे. मधुराणी आणि अमोल त्यानंतरच्या टप्प्यात प्रेक्षकांना पुन्हा दिसणार आहेत.

मालिकेतील तरुण कलाकारांविषयी ..

आई कुठे काय करते या मालिकेनंतर बऱ्याच काळाने अभिनेता अभिषेक देशमुख ' मी सावित्री ज्योतीराव फुले ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर राजश्री भावे हिने फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमातील तिच्या भूमिकेमुळे अनेकांचे लक्षात राहिली आहे. तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike on Viju Mane: 'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
'या सिनेमासाठी बायको, आई अन् बहिणीचे दागिने गहाण ठेवले...'; विजू मानेंच्या त्यागाचा खुलासा करत कुशल बद्रिके झाला भावुक
Sonali Bendre in Sohala: सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
सोनाली बेंद्रेची नवी इनिंग! मराठी सिनेविश्वात एन्ट्री, 'सोहळा' कधी होणार प्रदर्शित?
Mahima Makwana on Struggle: 5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
5 महिन्यांची असताना डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं, चाळीत घालवलं बाळपण; 26 व्या वर्षी अभिनेत्री कशी बनली करोडपती?
Ravi Kishan Loses 18 Kg: नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट
नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहणार्‍या रवि किशनने घटवलं 18 किलो वजन, अभिनेत्याने रिव्हिल केलं आपलं डाएट सिक्रेट

व्हिडीओ

Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
'भाजपच्या जवळपास 100 खासदारांवर फौजदारी गुन्हे पोलिसांनी त्यांच्यावर पहिल्यांदा उर्जा केंद्रीत करावी..' मोदींवर टिप्पणी करणाऱ्या मुलीविरुद्धच्या एफआयआरला काॅकरोच जनता पार्टीचा विरोध
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
एकतर मंत्रालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द करा, अथवा...; फेरतपासणीनंतर हायकोर्टाने FDA अधिकाऱ्यांना झापलं
Bhiwandi Building Collapses: तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
तीन दिवस हॉटेलमध्ये झोपले, पण आज इमारतीचं काम पाहायला जाताच बिल्डींग कोसळली; संतोष पांडेचा मृत्यू, सर्वत्र हळहळ
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Video: 'दक्षिणा दानपेटीत नको खिशात द्या..' खासदार पप्पू यादव पुजाऱ्याच्या वेशात आंदोलन करत देणगी घेऊन पळाले, खासदारांनी पकडलं; राम मंदिरातील लुटीवरून संसदेच्या दारात विरोधकांचे अभिनव आंदोलन
Embed widget