Bigg Boss 15: बिग बॉस 15 शोच्या सेट डिझाइनरवर चोरीचा आरोप; कॉपी केल्याने ट्रोल
डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Salman Khan Show Bigg Boss 15: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस नेहमी चर्चेत असतो. या शोचे सुत्रसंचालन बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान करत आहे. शोमधील स्पर्धकांच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष असते. मराठी बिग बॉससोबतच हिंदी बिग बॉसला देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सध्या हा शो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. शोच्या सेट डिझाइनरवर सध्या कॉपी केल्याचा आरोप होत आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केले. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार नॉमिनेशनचा टास्क
डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांची पोस्ट
डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांनी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये बिग बॉस सिझन 15 चा सेट आणि दुसऱ्या फोटोमध्ये फ्लोरिडाच्या टाम्पा इंटरनेशनल एयरपोर्टचा आहे. या दोन्ही फोटोंमध्ये सारखे पणा दिसत असून त्या फोटोंमध्ये गुलाबी फ्लेमिंगो देखील दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये बिग बॉसने त्यांच्या 15 व्या सिझनचा सेटची डिझाइन चोरी केल्याचा आरोप डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांनी
डिझाइनर वर केला आहे. एका रिपोर्टनुसार, टाम्पा इंटरनेशनल एयरपोर्टवरील हा फ्लेमिंगो 3.9 कोटी खर्च करून तयार करण्यात आला आहे.
डिजिटल कंटेंट क्रिएटर सब्या यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सध्या सोशल मीडियावर बिग बॉस शोला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. बिग बॉसचा सेट ओमंग कुमार यांनी तयार केला आहे.
Actor Dharmendra First Car: धरम पाजींनी जपून ठेवलीये पहिली कार; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्