Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार नॉमिनेशनचा टास्क
जीपमध्ये बसलेल्या सदस्यांत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीराचा समावेश आहे. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे.
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये घरातील सदस्य जीपमध्ये बसण्यासाठी धावपळ करताना दिसून येणार आहेत. जीपमध्ये बसलेल्या सदस्यांत गायत्री, उत्कर्ष, स्नेहा, जय आणि मीराचा समावेश आहे. जीपमधील सदस्यांनी बहुमताने निवडलेल्या एका सदस्याला जीपमधून उतरावे लागणार आहे.
आज स्नेहा आणि आदिशमध्ये पुन्हा एकदा वादाची होणार आहेत. आदिश घरामध्ये आल्यापासून प्रत्येक सदस्यासोबत हुज्जत घालताना दिसून येतो आहे. आदिशच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरात खळबळ उडाली आहे. घरातील सदस्य त्याच्या विरोधात बोलताना दिसून येत आहेत. बिग बॉसने दिलेल्या कार्यामुळे आदिशबद्दल जय, उत्कर्ष आणि त्यांच्या गटात नकारात्मक भावना आहेत. त्या वेळोवेळी दिसून येत आहेत. आदिश आणि जयनंतर आता स्नेहा आणि आदिशमध्ये देखील वाद होणार आहेत. आज एका टास्क दरम्यान आदिश स्नेहाकडे चर्चा करताना दिसून येणार आहे. पण त्या चर्चेचे रुपांतर भांडणात झालेले पाहायला मिळणार आहे. आदिशला स्नेहाच्या संतापजनक प्रतिक्रियेचा सामना करावा लागणार आहे.
आदिशच्या मते, "तुझं वैयक्तिकरित्या इरिटेशन असेल तर.. पण प्रतिक्रिया अशी माझा इन्फ्लुएन्स, मी जे बोलतो आहे ते देखील काऊंट होणार आहे". यावर स्नेहा म्हणते,"तुमचं इन्फ्लुएन्स माझ्यासाठी काऊंट होतं नाही तुम्हाला असं वाटतं असेल मी तुमच्याकडे यावं प्रतिक्रिया मागायला तर तसं होणार नाहीये. मी काय विचारू". त्यावर आदिश म्हणाला, काय? त्यानंतर हा वाद वेगळ्याच दिशेला गेलेला पाहायला मिळणार आहे.
बिग बॉस मराठीमध्ये काल सिझनमधील पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली. आदिश वैद्य घरामध्ये जाताच त्याला एक नवा टास्क देण्यात आला आणि त्याने तो पूर्णपणे निभावला देखील. पॉवरकार्ड स्वीकारले आणि त्याची किंमत घरातील तीन सदस्यांना आता मोजावी लागत आहे. दादुस, मीनल आणि जय हे बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घराचे पहारेकरी असणार आहेत. काल जय आणि आदेशमध्ये खूप मोठे भांडण झाले आहे. आज जय, गायत्री, स्नेहा, उत्कर्ष आदिशबद्दल बोलताना दिसणार आहेत.
जय गायत्रीला सांगणार आहे,"एक खरं बोलू का गायत्री, आवडतं मला तुझा अॅटीट्यूड". गायत्री म्हणाली,"माझ्या फ्रेंडला कोणी काही बोललं तर मी तोंडावर बोलणार". उत्कर्ष म्हणाला, "तो कॉमेडी" आहे, जयचं पण म्हणण पडलं कसा चालतो तो बघितलं का ? जसा काही हा कोणी सव्वाशेर, खरंच कॉमेडी आहे...गायत्री तो कसं चालतो याची नक्कल करून दाखवणार आहे. स्नेहा म्हणाली,"मी त्याच्याकडे बघून बोलत नव्हते तर तो मला बोला तू माझ्याकडे बघत पण नाही आहे. उत्कर्ष म्हणाला,"त्याचा हा सगळा दिखावा आहे".