एक्स्प्लोर

120 मिनिटांची सस्पेन्स-थ्रिलर फिल्म, ज्यात तरुणींचे प्रायव्हेट व्हिडीओ होतायत लीक; पटकथा 'अपरिचित', 'दृश्यम'लाही मागे टाकते

Best Psychological Thriller Film: ही साऊथ फिल्म आहे, जी सायकोलॉजिकल थ्रिलर फिल्म आहे. तुम्ही ही फिल्म पाहायला सुरुवात केल्यानंतर संपेपर्यंत जागेवरुन हलणारसुद्धा नाही.

Best Psychological Thriller Film: जर तुम्हाला दृश्यम (Drishyam) आणि अपरिचित (Aparichit) सारखे साऊथचे चित्रपट (South Movie) आवडत असतील तर आज आम्ही तुम्हाला एक दमदार फिल्म सांगतो. ही फिल्म तुम्ही ओटीटीवर (OTT Releaed) अगदी सहज पाहू शकता, तेसुद्धा अगदी मोफत. ही फक्त 120 मिनिटांची फिल्म 'अपरिचित', 'दृश्यम'सारख्या चित्रपटांनाही मागे टाकते. ही एक साऊथ फिल्म आहे, जी सायकोलॉजिकल थ्रिलर (Psychological Thriller) फिल्म आहे. तुम्ही ही फिल्म पाहायला सुरुवात केल्यानंतर संपेपर्यंत जागेवरुन हलणारसुद्धा नाही.  

साऊथची सायकोलॉजिकल फिल्म 'पुरियथा पुथिर'

'पुरियाथा पुथिर' (Puriyatha Puthir) असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्यामध्ये साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत झळकले होते. यावरुनच ओळखून जा की, चित्रपट किती भारी होता ते. हा चित्रपट मूळतः तमिळ भाषेत बनवण्यात आला होता. पण, हा चित्रपट हिंदीतही उपलब्ध आहे. या फिल्ममध्ये अनेक रहस्यांशी संबंधित एक कथा तुमचे दोन तास सार्थकी लावते.  

'पुरियथा पुथिर' चा अर्थ

'पुरियथा पुथीर' म्हणजे गूढ, रसस्य किंवा एक न सुटलेलं कोडं. ही फिल्म पाहताना अनेक रहस्य तुमच्या मनात प्रश्न निर्माण करतील. या चित्रपटात विजय सेतुपती यांच्या व्यतिरिक्त गायत्री, महिमा नंबियार यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित जयकोडी यांनी केलं आहे. खरंतर हा चित्रपट 2013 पर्यंत प्रदर्शित झाला असता. पण निर्मितीला वेळ लागला आणि चित्रपट रिलीज व्हायला उशीर झाला. अखेर हा चित्रपट 2017 मध्ये  प्रदर्शित झाला.

'पुरियाथा पुथिर'ची पटकथा 

'पुरियाथा पुथिर' फक्त 120 मिनिटांचा चित्रपट आहे. म्हणजेच, फक्त दोन तासांचा. पण, एकदा का तुम्ही हा चित्रपट पाहायला सुरुवात केली, तर बेट लावून सांगतो की, तुम्ही जागेवरुन हलणारही नाही. अगदी पहिल्या मिनिटांपासून कथा तुम्हाला गुरफटून टाकते. फिल्म सुरू होते, एका सुंदर महिलेसोबत, जी बिल्डिंगच्या टेरेसवर उभी राहून कुणालातरी फोन करते. सॉरी म्हणते आणि तरीसुद्धा सर्वकाही ठीक होत नाही म्हणून बिल्डिंगच्या टेरेसवरुनच उडी घेत जीव देते. सुरुवातीच्या काही मिनिटांची कहाणी तुमचं लक्ष वेधून घेते. 

MMS प्रायव्हेट लीक प्रकरणावर बनलीय फिल्म

फिल्मची कथा जसजशी पुढे जाते, तसतशी लीड रोलमध्ये असलेल्या कथीर (विजय सेतुपती)ची एन्ट्री होते.  कथीरची नजर मीरा (गायत्री) वर पडते. तिला पाहून तो हसायला लागतो. दोघांची मैत्री होते, त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं. दोघेही या नात्यात खूप खूश असतात. पण, तिथेच ट्वीस्ट येतो. कथीरला मीराचे काही प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो सापडतात. त्यानंतर मात्र कथीर हैराण होतो. मीराचे असेल प्रायव्हेट व्हिडीओ आणि फोटो नेमकं कोण काढतंय? या प्रश्नानं तो पुरता गोंधळून जातो. त्यानंतर ब्लॅकमेलिंग सुरू होते. ही फिल्म मुख्यतः महिलांसोबत होणाऱ्या ब्लॅकमेलिंग आणि लीक होणाऱ्या एमएमएसवर आधारित आहे. 

नंतर, मुख्य कलाकार कथेत प्रवेश करतात. कथीर (विजय सेतुपती) त्याची नजर मीरा (गायत्री) वर ठेवतो. तिला पाहून तो हसायला लागतो. ते दोघेही मित्र बनतात आणि प्रेमात पडतात. दोघेही या नात्यात खूप आनंदी होते. पण कथेत ट्विस्ट येतो जेव्हा त्याला मीराचे काही खाजगी व्हिडिओ आणि फोटो सापडतात. मीराचे हे गुप्त व्हिडिओ कोणी बनवले आहेत असा प्रश्न त्याला पडला आहे. मग ब्लॅकमेलिंग सुरू होते. हा चित्रपट मुळात महिलांसोबत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगवर आणि एमएमएस लीक होण्यावर आधारित आहे.

ही फिल्म YouTube वर हिंदीमध्ये पाहू शकता

आता या वाईट कृत्यांमागचा शैतान नेमका कोण? हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. जर तुम्हाला या चित्रपटाची कथा आवडली असेल, तर तुम्ही ती हिंदी आवृत्ती YouTube वर पाहू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बॉलिवूडमध्ये ब्लॉकबस्टर, पण साऊथमध्ये सुपरफ्लॉप ठरला 'हा' खलनायक; मेकर्सचे 350 कोटी पाण्यात, प्रेक्षकांनी फिरवली पाठ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 22 March 2025Nitesh Rane Sawantwadi | अगोदरही राणेंना काही फरक पडायचा नाही, आजही पडत नाही, उद्याही पडणार नाहीNarayan Rane emotional PC : आज आहे, उद्या नसेन, पण नसलो तरी… पत्रकार परिषदेच्या शेवटी राणे इमोशनलABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 22 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Narayan Rane PC | 'त्या' घरात आदित्य काय धुमाकूळ घालत होता, मला माहिती, राणेंची आक्रमक पत्रकार परिषद
Devendra Fadnavis : फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
फडणवीसांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
China Counties In Ladakh : लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
लडाखमध्ये चीनची घुसखोरी सुरुच, दोन नव्या काउन्टीची निर्मिती; केंद्र सरकार 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने विरोध करणार!
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती? Photos
Ajit Pawar & Jayant Patil : जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
जयंत पाटील पक्ष सोडतील हे निश्चित; अजितदादा-जयंत पाटलांची बंद दाराआड चर्चा होताच शिवसेना नेत्याचा मोठा दावा
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
टील ब्लू ऑफ शोल्डर गाउनमध्ये निमरत कौरचा क्लासी लुक!
IPO Update : शेअर बाजारानं ट्रेंड बदलला, सलग पाच दिवस तेजी, एलजी ते टाटा कॅपिटल , 5 कंपन्यांचे आयपीओ रांगेत
बाजारात पुन्हा चैतन्य, गुंतवणूकदार मालामाल, एलजी ते टाटांच्या कंपन्यांचे आयपीओ येणार
JAC meeting on Delimitation : अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
अन्यथा आमची ओळख संपेल! चेन्नईत अवघा दक्षिण भारत एकवटला अन् उत्तरेतून भगवंत मान, बीजेडी प्रमुख नवीन पटनायक, तृणमूलही सामील; नेमकं काय घडतंय?
Embed widget