Bade Achhe Lagte Hain 2 : राम आणि प्रियाची गोष्ट 100 एपिसोड्सची झाली, नकुल आणि दिशाने व्यक्त केली नवी आशा
Bade Achhe Lagte Hain 2 : सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर दाखवली जाणारी लोकप्रिय मालिका म्हणजेच 'बडे अच्छे लगते है सीझन-2' ने नुकताच 100 एपिसोड्सचा पल्ला पार केला आहे.
Bade Achhe Lagte Hain 2 : सोनी एंटरटेन्मेंट वाहिनीवर दाखवली जाणारी लोकप्रिय मालिका म्हणजेच 'बडे अच्छे लगते है सीझन-2' ने 100 एपिसोड्सचा पल्ला पार केला आहे. ऑनस्क्रिन कपल राम (Nakul Mehta)आणि प्रिया (Disha Parmar)यांच्या फॅन्सना यामुळे खूप आनंद झाला आहे. फॅन्सने दाखवलेल्या प्रेमामुळे नकुल आणि दिशादेखील भारावले आहेत. जर चाहत्यांचं असंच प्रेम या मालिकेला मिळालं तर ही मालिका लवकरच 100 एपिसोड्ससुद्धा पूर्ण करेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे. प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळणाऱ्या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे 'बड़े अच्छे लगते हैं सीझन-2. या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे या मालिकेतील राम आणि प्रियाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणात आवडली.
'बड़े अच्छे लगते हैं सीझन-2 या मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाल्यानंतर दिशा परमारने आपला आनंद व्यक्त केला आहे. दिशा म्हणाली, "असं वाटतं ही कालचीच गोष्ट आहे. जेव्हा मला या मालिकेतील प्रियाच्या भूमिकेविषयी विचारण्यात आले. आणि आता या मालिकेचे 100 एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. हा 100 भागांचा काळ कसा निघून गेला काहीच कळले नाही. या मालिकेतील प्रत्येक भागात आम्ही प्रेक्षकांना काहीना काही नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. काळानुसार आमच्या मालिकेतील पात्रांमध्येसुद्धा अनेक चांगले बदल होत गेले आहेत. प्रियाने मला जगण्याचा नवीन दृष्टीकोण दाखवला आहे. या पात्राने मला प्रेक्षकांकडून आणि माझ्या कुटूंबियांकडून भरपूर प्रेम मिळालं आहे. हे सगळंच खूप अविस्मरणीय आणि खास आहे."
तर अभिनेता नकुल मेहता म्हणाला, "हा खूप चांगला काळ आहे. आमचा हा प्रवास फारच सुंदर आणि अचंबित करणारा आहे. मालिकेतील राम एक महत्वाचं पात्र आहे आणि मला प्रेक्षकांसाठी स्क्रिनवर हे पात्र साकारताना खूप छान वाटतं. लंडन असो वा दिल्ली मागच्या काही महिन्यात मी जिथे कुठे प्रवास केला आहे तिथे तिथे मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांचे मी आभार मानतो. यांच्यामुळेच सेटवरचं वातावरण उत्साहित असतं. या प्रवासात माझ्याबरोबर कायम असणाऱ्या मी माझ्या चाहत्यांचेदेखील आभार मानतो. यांच्यामुळेच आम्ही 100 एपिसोड्सचा पल्ला गाठला आहे. प्रेक्षकांचं प्रेम जर असंच मिळालं तर आम्ही लवकरच 1000 एपिसोड्ससुद्धा नक्कीच पूर्ण करू".
हे ही वाचा :
- Kiran Rao चे दिग्दर्शनात कमबॅक, Aamir Khan करणार सिनेमाची निर्मिती
- Bigg Boss 15 : सलमान खानने घेतली तेजस्वीची शाळा, म्हणाला, ज्या थाळीत खाता...
- Verses Of War : सैन्य दिनी Vivek Oberoi ने शेअर केला 'वर्सेस ऑफ वॉर' सिनेमाचा टीझर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha