Bigg Boss 15 : सलमान खानने घेतली तेजस्वीची शाळा, म्हणाला, ज्या थाळीत खाता...
Bigg Boss 15: 'बिग बॉस 15' च्या आगामी भागात सलमान खान घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे.
Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमात नुकतेच तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि शमिता शेट्टीचे (Shamita Shetty) भांडण झाले होते. 'बिग बॉस 15' च्या आगामी भागात सलमान खान घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. आजच्या भागात सलमान तेजस्वीची शाळा घेताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये सलमान खान संतापलेला दिसून येत आहे. सलमान तेजस्वीला म्हणाला,"ज्या थाळीत खाता त्याला कोणी छिद्र पाडतं का?". तसेच बिग बॉसच्या आगामी भागात गौहर खान खास पाहुणी म्हणून येणार आहे. गौहर घरातील सदस्यांना काही खास टास्कदेखील देणार आहे. या टास्कदरम्यान तेजस्वी आणि निशांतमध्ये वाद झालेले पाहायला मिळणार आहेत.
View this post on Instagram
दोन आठवडे शो वाढवण्याचा निर्णय
शोचा एक नवीन प्रोमो चॅनलने शेअर केला आहे, ज्यामध्ये सलमान खान शो दोन आठवड्यांनी वाढवल्याची घोषणा करताना दिसत आहे. सलमानची ही घोषणा ऐकल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. प्रोमोमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सर्व स्पर्धक लिव्हिंग एरियामध्ये बसलेले दिसत आहेत आणि बिग बॉस त्यांना सांगतात की फिनालेचे तिकीट जिंकण्याची लढाई अद्याप संपलेली नाही. त्यानंतर सलमान खान स्पर्धकांना एक आनंदाची बातमी असल्याचे सांगतो की, हा शो दोन आठवडे वाढवला जात आहे. हे ऐकल्यानंतर राखी सावंत आनंदाने ओरडू लागते, तर निशांत आणि शमिता शेट्टीला धक्का बसताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
Verses Of War : सैन्य दिनी Vivek Oberoi ने शेअर केला 'वर्सेस ऑफ वॉर' सिनेमाचा टीझर
Indian Army Day : 'बॉर्डर'पासून 'शेरशाह' ते 'उरी'पर्यंत... 'हे' चित्रपट दाखवतात भारतीय जवानांचे धैर्य
Ratan Tata share Photo With Rockstar Slash : रतन टाटा यांनी शेअर केला रॉकस्टार स्लॅशसोबतचा खास फोटो; रणवीरच्या कमेंटनं वेधलं लक्ष
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha