एक्स्प्लोर

Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?

Ashok Saraf On National Doctors Day : अशोक सराफ यांनी डॉक्टरांबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.  आगामी चित्रपटात आपण डॉक्टरांची भूमिका करत आहोत. त्यानिमित्ताने डॉक्टरांसमोरील आव्हाने, मेहनत हे जवळून पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. 

Ashok Saraf On National Doctors Day:  आपल्या जीवनात डॉक्टरांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. ज्येष्ठ अभिनेते, महाराष्ट्रभूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या उपस्थितीत मुंबईत आज राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी डॉक्टरांबाबत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.  आगामी चित्रपटात आपण डॉक्टरांची भूमिका करत आहोत. त्यानिमित्ताने डॉक्टरांसमोरील आव्हाने, मेहनत हे जवळून पाहता आल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे आता रुपेरी पडद्यावर डॉक्टरांची भूमिका साकारणार आहे. जुने रीतिरिवाज आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संघर्षावर आधारित 'लाईफलाईन' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर या दिग्गजांमधील अभिनयाची  जुगलबंदी पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अशोक सराफ एका प्रख्यात डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत मुंबईत साजऱ्या करण्यात आलेल्या ‘डॉक्टर्स डे सेलिब्रेशन’ या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या ‘लाईफलाईन’ चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी देशातील अनेक नामवंत डॉक्टर्स उपस्थित होते. अशोक सराफ यांनी यावेळी डॉक्टरांशी संवाद साधला. या कार्यक्रमात अशोक सराफ आणि डॉक्टर अशी 'फॅन मुमेंट'ही पाहायला मिळाली. यावेळी अशोक सराफ यांनी डॉक्टरांच्या परिश्रमाचे कौतुक केले. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे काय महत्व आहे, हे सुद्धा त्यांनी यावेळी विशद केले.

डॉक्टरांबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?

आपल्या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रीय डॉक्टर दिनाबद्दल अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले की, '' आज या प्रख्यात डॉक्टरांसोबत हा दिवस साजरा करता आला, हे मी माझे सौभाग्य मानतो. माझ्या आगामी चित्रपटामुळे मला हा क्षण अनुभवता आला. ‘लाईफलाईन’ या चित्रपटातील माझी व्यक्तिरेखा या खास दिनानिमित्ताने समोर आली आहे. या चित्रपटात मी यात एका डॉक्टरची व्यक्तिरेखा साकारत आहे. मुळात या क्षेत्राबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे आणि या चित्रपटामुळे  हा आदर अधिकच वाढला आहे. ही भूमिका साकारताना मला डॅाक्टरांची मेहनत, रुग्णांप्रती असलेली आत्मीयता, त्यांना करावा लागणारा विविध गोष्टींचा सामना, विरोध या सगळ्या गोष्टी मला या व्यक्तिरेखेमुळे अनुभवता आल्याची भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली. प्रत्येक गोष्टीमागे काही विज्ञान असते, हे रीतिरिवाजांमध्ये गुरफटलेल्यांना पटवून देणे किती जिकिरीचे काम आहे, हे मला या चित्रपटातून समजले असल्याची प्रांजळ कबुलीदेखील सराफ यांनी दिली.  

चित्रपटात कोणते कलाकार?

'लाईफलाईन' या  चित्रपटात अशोक सराफ, माधव अभ्यंकर, हेमांगी कवी, भरत दाभोळकर, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आणि समीरा गुजर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. साहिल शिरवईकर यांनी दिग्दर्शन केले आहे.  लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटातील गाणी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केली असून या भावपूर्ण गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर ह्यांचा आवाज लाभला आहे. हा चित्रपट 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणारPradeep Aaglawe On Deekshabhoomi: एका अफवेमुळे दीक्षाभुमीजवळ आंदोलन पेटलं?आगलावेंची प्रतिक्रिया काय?Ambadas Danve : अंबादास दानवेंवरील कारवाईचा ठाकरे गटाच्या आमदारांकडून निषेध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! पिक विमा अर्ज भरताना 1 रुपयापेक्षा अधिक शुल्क मागितल्यास कुठे कराल तक्रार?
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
CM Ladki Bahin Yojna: मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मोठी बातमी : 'त्या' मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या प्रकाश महाजन यांची मागणी
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget