Drugs Case: ड्रग्स केसमध्ये अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ अटकेत, Arjun Rampal म्हणाला...
Drugs Case: NCB च्या टीमनं अभिनेता अर्जुन रामपालची (Arjun Rampal) गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ आगिसिल्सला गोव्यात अटक केली आहे. यावर अर्जुन रामपालनं आपलं स्टेटमेंट जारी केलं आहे.
Drugs Case: नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या टीमनं अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सचा भाऊ आगिसिल्स डेमेट्रीएड्सला गोव्यात अटक केली आहे. त्यावेळी त्याच्याकडून चरस जप्त केले. यावर अर्जुन रामपालनं आपलं स्टेटमेंट जारी केलं आहे. त्यात आवाहन केलं आहे की, या प्रकरणात माझं नाव घेतलं जाऊ नये.
Drugs Case: अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलाचा भाऊ आगिसिल्स डेमेट्रीएड्सला गोव्यात अटक
अर्जुन रामपालनं म्हटलं आहे की, प्रिय मित्रांनो, चाहत्यांनो आणि नागरिकांनो जितकं आपण ही बातमी ऐकूण हैराण आहात तेवढाच मी देखील आहे. दुर्दैवी आहे की, प्रत्येक बातम्यांमध्ये माझं नाव गरज नसताना घेतलं जात आहे. जे की माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझा आणि माझ्या परिवाराचा याच्याशी काहीही संबंध नाही. मी कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. जर कुण्या घटनेत माझ्या नातेवाईकाचं नाव समोर येत असेल तर त्यात माझं नाव कशाला? माझं या प्रकरणाशी काहीही कनेक्शन नाही, तो केवळ माझ्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे.
Armaan Kohli Arrested: NCBची मोठी कारवाई, अभिनेता अरमान कोहलीला अटक
त्यानं पुढं म्हटलं आहे की, मी मीडियाला आवाहन करतो की, माझं नाव घेत या प्रकरणात हेडलाईन बनवू नये. यामुळं मला आणि माझ्या परिवाराला अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्हाला आमच्या लीगल सिस्टम वर विश्वास आहे. जे कुणी कायद्याचं उल्लंघन करेल त्याला शिक्षा जरुर मिळायला हवी. मला सिस्टीमवर विश्वास आहे. मी आशा व्यक्त करतो की माझं आणि माझ्या पार्टनरचं नाव अशा गोष्टीत घेऊ नका, ज्याच्याशी आमचा काही संबंध नाही, असं अर्जुन रामपालनं म्हटलं आहे.
एनसीबीचे समीर वानखेडे यांनी हे मिशन राबवण्यास सुरूवात केली. मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले होते. मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करण्यामध्ये समीर वानखेडेची महत्त्वाची भूमिका बजावली होती. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगिसिल्सच्या विरुद्ध ही तिसरी कारवाई होती. या अगोदर सुशांत सिंह राजपूत प्रकरणात देखील नाव पुढे आले होते.
या अगोदर एनसीबीच्या मुंबई युनिट अभिनेता अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. या छाप्या दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घरातून अनेक औषधे जप्त केली होती. एनसीबीने काही दिवसांपूर्वीच चार्जशीट दाखल केली होती. या प्रकरणात एनसीबीने अर्जुन रामपाल संशयित मानले आहे.
चार्जशीटनुसार मुंबई एनसीबीने 3 डिसेंबर 2020 ला रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिकेच्या काउंसलेट जनरलला लिहिलेल्या पत्रात लिहिले होते की, एनसीबीने बॉलीवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली. त्याच प्रकरणात अर्जुन रामपाल देखील संशयित आहे. एनसीबीला शंका आहे की, अर्जुन रामपाल भारत सोडून दक्षिण आफ्रिकेला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान अर्जुनने आपल्या जबाबामध्ये एनसीबीने म्हटले आहे की, जी औषधे एनसीबीने जी औषधे जप्त केली. ती बहिणीची एनिकसिटीची औषधे होती.