चेहऱ्यावर सुरकुत्या, वार्धक्य आलं! ओरिजनल 'आशिकी गर्ल'चा सध्याचा अवतार पाहून चाहत्यांना ओळखता सुद्धा येईना
Anu Aggarwal : चेहऱ्यावर सुरकुत्या, वार्धक्य आलं! ओरिजनल 'आशिकी गर्ल'चा सध्याचा अवतार पाहून चाहत्यांना ओळखता सुद्धा येईना

Anu Aggarwal : दिग्दर्शक महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला आशिकी हा सिनेमा 90 च्या दशकात चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमातील गाण्यांनी अनेक तरुणांना भुरळ पडली होती. कुमार सानू यांनी गायलेल्या गाण्यांना आज देखील प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर आजही ही गाणी ऐकली जातात. याशिवाय आशिकी हा सिनेमा अनु अग्रवाल आणि राहुल रॉय यांच्या अभिनयासाठी देखील ओखळला जातो. एकेकाळी तरुणांना सौंदर्याने भुरळ पाडणारी अनु अग्रवाल आता वार्धाक्याला झुकलीये. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यात. इन्स्टाग्रामसह इतर काही प्लॅटफॉर्म्सवर ती सध्या व्हिडीओ शेअर करताना दिसत असते.
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' चित्रपटातून राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर दोघेही मोठे स्टार बनले. नजर के सामने, धीरे धीरे से, बस एक सनम चाहिये आणि जाने जिगर जानेमन ही चित्रपटातील गाणी हिट ठरली. त्या काळी सर्वात जास्त या गाण्यांचा आल्बम विकला जात होता.
'आशिकी'ने अनु अग्रवाल रातोरात स्टार बनली होती. यानंतर ती किंग अंकल, खल-नायिका आणि जन्म कुंडली सारख्या काही इतर चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, यापैकी कोणत्याही सिनेमाला आशिकी एवढं यश मिळालं नाही. गोरी नसल्यामुळे अनेकदा ट्रोल करण्यात आल्याचंही तिने अनेकदा बोलून दाखवलं होतं. पदार्पणाच्या सहा वर्षांनंतर अनु शांतपणे अभिनयापासून दूर गेली. खरंतर, 1999 मध्ये, अभिनेत्रीचा कार अपघात झाला होता. अपघातानंतर ती 29 दिवस कोमात होती, त्यानंतर तिची स्मरणशक्तीही गेली होती.
बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अनु अग्रवाल यांनी सांगितले होते की, एके दिवशी ती एका पार्टीतून परत येत होती आणि त्याच दरम्यान तिच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी ती 30 वर्षांची होती. अनुने सांगितले होते की तिला अपघातात खूप गंभीर दुखापत झाली होती. यातून पूर्णपणे सावरण्यासाठी बरं होण्यासाठी तिला 3 वर्षे लागली होती. या काळात त्याला खूप वेदना सहन कराव्या लाग्लाय. तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या आणि त्याचा चेहराही बदलला.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या



















