एक्स्प्लोर

Bollywood Movie Karan Arjun 2: 'करण अर्जुन 2'मध्ये कोण घेणार शाहरुख-सलमानची जागा? दिग्दर्शकांनी सांगितली 'या' सुपरस्टार्सची नावं

Bollywood Movie Karan Arjun 2: दिग्दर्शक राकेश रोशन यांना'करण अर्जुन 2' मध्ये शाहरुख, सलमानची जागा कोण घेऊ शकतं? त्यावेळी त्यांनी दोन नावं सांगितली, जी तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच आवडतील.

Bollywood Movie Karan Arjun 2: बॉलिवूडचे (Bollywood Supestars) दोन सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी अनेक सुपरहिट क्लासी चित्रपटांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. दोघांच्या जोडीनं लोकांना अक्षरशः वेडं लावलं होतं. दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहणं चाहत्यांसाठी नेहमीच एक मोठी पर्वण असते. दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केलेल्या चित्रपटांपैकी एक सुपरडुपर हिट चित्रपट म्हणजे, 'करण अर्जुन' (Karan Arjun Movie).  या चित्रपटात दोघांनी सख्ख्या भावांची भूमिका साकारली होती. आजही हा चित्रपट 90च्या कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. पण, आता लवकरच 'करण अर्जुन'चा सीक्वल येणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, यामध्ये सलमान-शाहरुख नाहीतर, त्यांच्याऐवजी वेगळेच सुपरस्टार दिसणार असल्याचं बोललं जात आहे. एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक राकेश रोशन यांनी याबाबत खुलासा केला आहे. 

दिग्दर्शक राकेश रोशन यांना'करण अर्जुन 2' मध्ये शाहरुख, सलमानची जागा कोण घेऊ शकतं? त्यावेळी त्यांनी दोन नावं सांगितली, जी तुम्हा आम्हा सर्वांना नक्कीच आवडतील. 

बॉलिवूडच्या दोन मोठ्या सुपरस्टार सलमान खान आणि शाहरुख खान यांचा पहिला चित्रपट 'करण अर्जुन' (1995) होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर उत्तम प्रतिसाद मिळाला आणि अनेक वर्षांनंतर, हा चित्रपट नोव्हेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित झाला. 'करण अर्जुन'च्या प्रचंड यशानंतर, लोक अनेकदा राकेश रोशन यांना विचारायचे की ते 'करण अर्जुन 2' बनवणार का? आणि मुख्य अभिनेता कोण असू शकतो?

राकेश रोशन यांनी सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये याचा उल्लेख केला होता. जेव्हा राकेश रोशन यांना विचारण्यात आलं की जर तुम्ही 'करण-अर्जुन 2' बनवला तर आजच्या कलाकारांपैकी कोण शाहरुख आणि सलमानची जागा घेऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देताना राकेश रोशन यांनी दोन नावं सांगितली. 

'करण अर्जुन 2' मध्ये शाहरुख-सलमान व्यतिरिक्त कोण लीड करणार?  

पॉडकास्टमध्ये 'करण अर्जुन 2' वर चर्चा झाली आणि त्यावर राकेश रोशन म्हणाले, 'जर कोणी मला विचारलं की, 'करण अर्जुन 2' मध्ये कोणते कलाकार शाहरुख आणि सलमानची जागा घेऊ शकतात, तर मी दोन नावे घेऊ इच्छितो. 'करण-अर्जुन 2' मध्ये मला रणबीर कपूर आणि हृतिकला पहायला आवडेल. कारण शाहरुख-सलमान नंतर जर कोणी या दोन्ही भूमिका साकारू शकत असेल, तर ते हेच दोघे आहेत.' यावर राकेश रोशन यांना विचारण्यात आलं की, तुम्ही 'करण-अर्जुन 2' बनवाल का? तर राकेश रोशन म्हणाले की, जर चांगली पटकथा सापडली आणि समन्वय चांगला असेल तर नक्कीच विचार करेल. 

'करण अर्जुन 2'चं लाईफटाईम बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

13 जानेवारी 1995 रोजी जगभरात प्रदर्शित झालेला 'करण अर्जुन' हा चित्रपट राकेश रोशन यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केला होता. या चित्रपटात हृतिक रोशननं असिस्टंट म्हणून काम केलं होतं. शाहरुख खाननं अर्जुनची भूमिका साकारली होती आणि सलमान खाननं करणची भूमिका साकारली होती, तर काजोल, ममता कुलकर्णी, राखी गुलजार, जॉनी लिव्हर, अमरीश पुरी, रणजीत, अशोर सराफ आणि आशिफ शेख हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.

सॅक्निल्कच्या मते, करण अर्जुन चित्रपटाचं बजेट 6 कोटी रुपये होतं, तर चित्रपटानं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर 43.10 कोटी रुपये कमावले, तर भारतात चित्रपटानं 41.50 कोटी रुपये कमावले. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि त्यातील गाणी आजही सुपरहिट आहेत. या चित्रपटानं रि-रिलीजनंतरही चांगलं कलेक्शन केलं. त्यामुळे सीक्वलही ब्लॉकबस्टर ठरेल, यात काही शंका नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Box Office Collection: 'छावा' जोमात, बाकी सारे कोमात; विक्की कौशल बॉक्स ऑफिसवर हिट, किंग खानच्या 'जवान'लाही पछाडलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget