RJ Mahvash-Yuzvendra Chahal: युझी चहलला आरजे महावशनं सांगितली 'दिल की बात'; क्लोज सेल्फी पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा, म्हणाले, 'भाभी 2 मिल गई...'
RJ Mahvash-Yuzvendra Chahal: धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर, युजवेंद्र सिंह चहल आरजे महवशला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

RJ Mahvash-Yuzvendra Chahal: क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट (Divorce) गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता. अखेर दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाला आणि दोघेही एकमेकांपासून वेगळे झाल्याचं समोर आलं. अशातच धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर, युझीच्या आयुष्यात पुन्हा नव्यानं प्रेमाचा बहर फुलल्याच्या चर्चांना उधाण आलं. युझवेंद्र चहल आणि आरजे महावश (RJ Mahvash) दोघांचे एका सामन्यादरम्यानचे फोटो व्हायरल (Viral Photo) झाले आणि तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या. अशातच आता महावशच्या नव्या पोस्टमुळे चर्चांना आणखी उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे.
धनश्री वर्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर, युजवेंद्र सिंह चहल आरजे महवशला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यादरम्यान आरजे महावश स्टेडिअममध्ये दिसून आली. तिनं स्टेडियममधले फोटो देखील शेअर केले आहेत. त्यासोबतच तिनं युजवेंद्र चहलसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
चहलसाठी चिअर करताना दिसली आरजे महावश
IPL च्या मैदानात मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होता. मुल्लापूर येथील न्यू पीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चहलच्या संघ पंजाब किंग्जनं चेन्नई सुपर किंग्जचा 18 धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान, महवाश देखील स्टेडियममध्ये खूप उत्साहात दिसली. ती चहलच्या संघाला चिअर करताना दिसली. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं.


महवशची चहलसाठी पोस्ट
स्टेडियममधून चहलला चिअर करतानाचे फोटो शेअर करताना, आरजे महवशनं एक खास कॅप्शनही लिहिलंय. त्यात ती म्हणाली आहे की, " कोणीतरी जो तुमच्या लोकांना प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळात साथ देतो आणि त्यांच्या मागे पर्वतासारखा उभा राहतो! आम्ही सर्व तुझ्यासाठी इथे आलो आहोत..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























