Ankita Walawalkar Post On Suraj Chavan: सूरज चव्हाण बोहोल्यावर चढणार, लाडक्या बहिणीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाली, 'लग्नाला येणं...'
Ankita Walawalkar Post With Bigg Boss Winner Suraj Chavan: सूरजच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम फुलल्याचं बोललं जात होतं. तसेच, सूरजला कमेंट करुन लग्नाच्या तारखांबाबतही विचारलं जात होतं. अशातच आता अंकिता वालावलकरच्या पोस्टनं लक्ष वेधलं आहे.

Ankita Walawalkar Post With Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता गुलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) काही दिवसांपूर्वी त्याच्या एका पोस्टमुळे चर्चेत आलेला. त्यावेळी सूरज चव्हाणचं लग्न (Suraj Chavan's Wedding) ठरल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. या पोस्टमध्ये सूरजनं एक फोटो शेअर केलेला. या फोटोमध्ये सूरज चव्हाणसोबत एक मुलगी दिसत होती. सूरजनं दाक्षिणात्य पोषाख वेअर केलेला. तर त्याच्यासोबत असलेल्या मुलीनंही साऊथ स्टाईल साडी नेसलेली. पण, त्या मुलीनं मात्र हातानं तिचा चेहरा झाकून घेतलेला. त्यामुळे सूरजच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम फुलल्याचं बोललं जात होतं. तसेच, सूरजला कमेंट करुन लग्नाच्या तारखांबाबतही विचारलं जात होतं. तर, अनेकांनी हा त्याचा नवा प्रोजेक्ट किंवा रिल असावं असा अंदाजही बांधलेला. पण, आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाणसोबत असलेली सहस्पर्धक आणि त्याची हक्काची बहीण असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरन केलेल्या एका पोस्टनं लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच, अंकिता प्रभू वालावलकरनं नुकतीच सुरजच्या गावी जाऊन त्याची भेट घेतली. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती सुरजसोबत त्याच्या बांधकाम सुरू असलेल्या नव्या घरासमोर उभी आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं एका मुलीला मिठी मारली आहे आणि त्याखाली सूरजला लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. तर, ज्या मुलीला मिठी मारलीये, तिच्या चेहऱ्यावर हॉर्ट इमोजी लावला आहे. तसेच, त्याखाली कॅप्शन लिहिलं आहे की, "सुरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट..."

अंकितानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. तर, सूरज चव्हाणचं लग्न ठरल्याचंही बोललं जात आहे. तसेच, चाहत्यांकडून कमेंट करुन लग्नाची तारीख काय? मुलगी कोण? यांसारखे प्रश्नही विचारले जात आहेत. सूरजला भाऊ मानणाऱ्या अंकितानंच अशी पोस्ट केल्यामुळे चाहत्यांनी सूरजचं लग्न ठरल्याचं कन्फर्म करुन टाकलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी उंचावणाऱ्या सूरज चव्हाणचा महाराष्ट्रभरात चाहता वर्ग आहे. सूरजनं ट्रॉफी उंचावल्यानंतर त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. बिग बॉस मराठीच्या मंचावरुनच दिग्दर्शक केदार शिंद यांनी सूरजला घेऊन सिनेमा करणार असल्याचं जाहीर केलेलं. तसेच, सूरजच्या घराचाही प्रश्न होता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तोसुद्धा मार्गी लावला. त्याचा 'झापुक झुपूक' सिनेमा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला. या सिनेमाचं दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केलं असून या सिनेमात सूरज चव्हाण मुख्य भूमिकेत झळकलेला. तसेच, त्याच्यासोबत इतर दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळालेली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























