(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anant Ambani Radhika Merchant Wedding : VIDEO: राजेशाही थाट, फुलांनी सजला हॉल, त्याला रोषणाईचा साज; अनंत-राधिकाच्या लग्नासाठी कसं सजलं 'जियो वर्ल्ड'?
Anant Ambani Radhika Merchant Wedding : भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही पाहुणे मंडळी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. विवाह सोहळा ज्या ठिकाणी रंगणार आहे, त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आला आहे.
Anant-Radhika Wedding Venue Inside Video : उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानी (Anant Ambani) आणी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या शाही विवाह सोहळ्यास आता फक्त काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. भारतातूनच नव्हे तर जगभरातूनही पाहुणे मंडळी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. अंबानी कुटुंबाने हा विवाह सोहळा संस्मरणीय ठरवण्यासाठी चांगलीच तयारी केली आहे. आता, विवाह सोहळा ज्या ठिकाणी रंगणार आहे, त्या ठिकाणचा व्हिडीओ समोर आला आहे.
अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या ठिकाणचा व्हिडीओ आला समोर...
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा हा मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता-मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नासाठी कशा प्रकारची सजावट करण्यात आली होती हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत आता अंबानींच्या लग्नाच्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. NMACC मधील लग्न समारंभाच्या ठिकाणच्या सजावटीचा व्हिडिओ बॉलीवूड बबलने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओमध्ये संपूर्ण विवाह स्थळ अतिशय शाही पद्धतीने सजवण्यात आले असल्याचे दिसते. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आकाशातून तारे जमिनीवर उतरले असल्याचा भास होत आहे. पाहुण्यांसाठी बसण्याची व्यवस्थाही उत्तम प्रकारे करण्यात आली आहे. लग्नात प्रत्येक छोट्या गोष्टीची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
अनंत-राधिकाच्या विवाह सोहळ्यात दिग्गजांची उपस्थिती
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी प्रियांका चोप्रा पती निक जोन्ससोबत मुंबईत पोहोचली आहे. त्यांच्याशिवाय आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी किम कार्दशियन आणि ख्लो कार्दशियन हे देखील अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचले आहेत. याशिवाय या शाही लग्नाला बॉलिवूडचे सर्व स्टार्स उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशिवाय अनेक राजकारणीही सहभागी होणार आहेत.