Anant Ambani Wedding : अनंत अंबानी पर्सनली रोल्स राॅयसमधून 'या' बाॅलिवूड स्टार जोडप्याला लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पोहोचले!
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट 12 जुलै 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
![Anant Ambani Wedding : अनंत अंबानी पर्सनली रोल्स राॅयसमधून 'या' बाॅलिवूड स्टार जोडप्याला लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पोहोचले! Anant Ambani & Radhika Merchant extends a personal invitation to Ajay Devgan for his upcoming Wedding Anant Ambani Wedding : अनंत अंबानी पर्सनली रोल्स राॅयसमधून 'या' बाॅलिवूड स्टार जोडप्याला लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी पोहोचले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/2b96b668c6ec92fb645a807987c25b521719317698545736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Anant Ambani Wedding : उद्योगपती अनंत अंबानी 12 जुलै 2024 रोजी राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी जय्यत तयारी करत आहे. त्यामुळे जय्यत तयारी सुरू झाली आहे. अलीकडेच, अनंत अंबानी बॉलीवूड स्टार जोडपे अजय देवगण आणि काजोल यांच्या घरी दिसले. अनंत अंबानी यांनी त्यांना वैयक्तिकरित्या लग्नासाठी आमंत्रित केले असल्याचे दिसते.
अनंत यांनी अजय-काजोलला लग्नाचे आमंत्रण दिले
24 जून 2024 च्या रात्री अनंत अंबानींचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये ते अजय देवगण आणि काजोलच्या मुंबईतील घर 'शिवशक्ती'मधून बाहेर पडताना दिसत होते. त्यांनी अजय-काजोलला स्वतःच्या लग्नासाठी आमंत्रित केले होते. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनंत त्याच्या 'रोल्स रॉयस'मध्ये बसून कडेकोट बंदोबस्तात होता. याआधी अनंतची आई नीता अंबानी यांनी 'काशी विश्वनाथ मंदिरात' लग्नाचे पहिले निमंत्रण दिले होते.
View this post on Instagram
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि एमडी मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट 12 जुलै 2024 रोजी मुंबईतील 'जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर'मध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. पाहुण्यांना लग्नपत्रिकाही दिली जाऊ लागली आहेत. कार्डबद्दल बोलायचे तर ते एक लाल आणि सोनेरी कार्ड आहे, ज्यामध्ये तीन दिवसांच्या उत्सवाबद्दल तपशील दिलेला आहे.
View this post on Instagram
अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल बोलायचे झाले तर, 12 जुलैपासून हा विवाहसोहळा सुरू होणार आहे. पहिला सोहळा शुभ विवाह असेल, ज्यासाठी भारतीय पारंपारिक ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 13 जुलै हा शुभ आशीर्वादाचा दिवस असेल आणि ड्रेस कोड भारतीय औपचारिक आहे. यानंतर 14 जुलै रोजी मंगल उत्सव किंवा लग्नाचे रिसेप्शन असेल आणि ड्रेस कोड भारतीय आहे. हे सर्व कार्यक्रम बीकेसीच्या 'जिओ वर्ल्ड सेंटर'मध्ये आयोजित केले जातील. यावर्षी मार्चमध्ये अंबानी कुटुंबाने अनंत-राधिकासाठी जामनगरमध्ये 3 दिवसीय प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. यानंतर, वधू-वरांसाठी 4 दिवसांच्या क्रूझ बॅशचे आयोजन करण्यात आले होते, जे 29 मे ते 1 जून पर्यंत चालले होते.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)