Chandramukhi : ‘चंद्रमुखी’ म्हटलं नि अमृताचंच नाव डोळ्यापुढे आलं! प्रसाद ओकने दिला चर्चांना पूर्णविराम!
Chandramukhi Movie : ‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृता खानविलकरची भूमिका समोर आल्यानंतर या पात्रावरून बरीच चर्चा रंगली होती.
Chandramukhi Movie : नवीन वर्षात मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच घेऊन आले आहेत. एका पेक्षा एक चित्रपट प्रदर्शित होत असतानाच, त्यात आता आणखी एका भव्य चित्रपटाची भर पडणार आहे. 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक (Prasad Oak) आता 'चंद्रमुखी' (Chandramukhi) हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, नुकतीच या चित्रपटातील पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत.
या चित्रपटात ध्येयधुरंदर राजकारण्याची भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) साकारणार आहे. तर, तमाशातील शुक्राची चांदणी अर्थात ‘चंद्रमुखी’ ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) साकारणार आहे. मात्र, सध्या ‘चंद्रमुखी’ या पत्रावरून नवी चर्चा पाहायला मिळतेय.
चंद्रमुखी साकारणार होती दुसरी अभिनेत्री?
‘चंद्रमुखी’ चित्रपटातील अमृता खानविलकरची भूमिका समोर आल्यानंतर या पात्रावरून बरीच चर्चा रंगली होती. आपली घायाळ करणाऱ्या अंदांनी भुरळ पाडणारी चंद्रमुखीची भूमिका मी अधिक चांगली साकारली असती, असा दावा अभिनेत्री-नृत्यांगना मानसी नाईकने एका मुलाखतीत केला होता. अर्थात या भूमिकेसाठी आपल्याला विचारणा झाल्याच तिने म्हटलं होतं. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता यावर अभिनेते-दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
चंद्रमुखीसाठी अमृताच पहिली पसंती!
नुकतीच प्रसाद ओक यांनी एका लोकप्रिय दैनिकाला एक मुलाखत दिली, यात त्यांनी चंद्रमुखीसाठी अमृताच पहिली पसंती असल्याचे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी जेव्हा चंद्रमुखी हा चित्रपट करायचं ठरवलं,तेव्हा अगदी पहिल्या दिवसापासून चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी फक्त अमृता खानविलकर हिचंच नाव डोक्यात होतं’, असे प्रसाद ओक म्हणाले. अमृताने या भूमिकेसाठी पाच ते सात किलो वजन वाढवलं आणि ते वजन तिने वर्षभर मेंटेन केलं, असं देखील ते म्हणाले.
‘चंद्रमुखी’चा टीझरही चर्चेत!
टिझरमध्ये ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल आणि साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी नृत्यांगना दिसत आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ पाहायला मिळत आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांना 'चंद्रमुखी'मध्ये पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा :
- RRR Movie Leak Online : 350 कोटींचं बजेट, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘RRR’ चित्रपट ऑनलाईन लीक!
- आराध्या बच्चनचा ‘स्कूल युनिफॉर्म’मधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत!
- Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha