एक्स्प्लोर

Amrita Arora Birthday : चित्रपटात फ्लॉप, पाकिस्तानी क्रिकेटरसोबत अफेअर, मैत्रीणीच्या पतीसोबत लग्न; कोट्यावधींची मालकीन आहे मलायकाची बहिण!

Amrita Arora Birthday : मलायका अरोराची बहिण आणि अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) हिचा आज 43 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे तिच्याकडून जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. अमृता अरोराची सिनेक्षेत्रातील कारकिर्द पूर्णपणे फ्लॉप होती. मात्र, तरीही तिच्या व्यक्तीगत आयुष्याच्या नेहमी चर्चा रंगत होत्या.

Amrita Arora Birthday : मलायका अरोराची बहिण आणि अभिनेत्री अमृता अरोरा (Amrita Arora) हिचा आज 43 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे तिच्याकडून जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. अमृता अरोराची सिनेक्षेत्रातील कारकिर्द पूर्णपणे फ्लॉप होती. मात्र, तरीही तिच्या व्यक्तीगत आयुष्याच्या नेहमी चर्चा रंगत होत्या. पाकिस्तानी क्रिकेटर सोबत प्रेमसंबंध ते मैत्रीणीच्या पतीसोबत लग्न केलेली अमृता नेहमीच वादात अडकली आहे. 

अमृता अरोरा (Amrita Arora) आज तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1981 मध्ये जन्मलेल्या अमृताने मलायका अरोराप्रमाणेच आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिने व्हिडीओ जॉकी म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. व्हिडीओ जॉकी म्हणून काम करताना यश मिळाल्यानंतर तिने 2022 मध्ये 'कितने दूर कितने पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

पहिलाच सिनेमात पूर्णपणे फ्लॉप 

बॉलिवूडमधील अमृता अरोराचा पहिलाच सिनेमा पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर तिने अनेक सिनेमे केले. मात्र, तरीही तिला म्हणावे असे यश मिळवता आले नाही. बॉलिवूडमधील कारकिर्दीमध्ये आपल्या अभिनयापेक्षा अमृताने  'दिल्ली की सर्दी' या आयटम साँगमुळे चर्चेत आली होती. पुढे ती तिच्या सिनेक्षेत्रातील कामापेक्षा व्यक्तीगत आयुष्यामुळे चर्चेत राहिली. 2004 मध्ये अमृताचे पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफजाल याच्याशी अफेयर सुरु झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उस्मान भारतात क्रिकेटच्या निमित्ताने आला. तेव्हा तिची भेट अमृताशी झाली. त्यानंतर दोघांमधील प्रेमसंबंध वाढीस लागले. 

उद्योगपतीसोबत थाटला संसार

पाकिस्तानी क्रिकेटर उस्मान अफजल याच्याशी ब्रेकअप झाल्यानंतर 2009 मध्ये अमृताने संसार थाटला. तिने उद्योगपती शकिल लडाग याच्या 2009 मध्ये लग्न केले. शकिल आणि अमृता यांच्यामध्ये कॉलेजपासून मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, कॉलेज संपल्यानंतर ते दोघे वेगळे झाले आणि शकिलने विवाह उरकला. मात्र, 2005 मध्ये शकिल आणि अमृताचे संबंध पुन्हा एकदा जुळले. त्याचवेळी शकिल लडागच्या पहिल्या विवाहात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे 2008 मध्ये शकिलने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. त्यानंतर पुढच्याच वर्षी शकिल आणि अमृता अरोराने विवाह केला. विवाहानंतर निशाने अमृतावर माझा संसार मोडल्याचे आरोप केले. अमृता आणि शकिलने ख्रिश्चन, मुस्लीम आणि पंजाबी अशा तिन्ही पद्धतीने विवाह केला. 
 
अमृता आणि शकिलने 2009 मध्ये विवाह केल्यानंतर 2010 मध्ये त्यांना एक मुलगा झाला. अजान असे त्यांनी मुलाचे नाव ठेवले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांना आणखी मुलगा झाला. त्याचे रियान असे नाव ठेवण्यात आले. दरम्यान अमृता आता ग्लॅमर आणि सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र, तरिही तिचे लाईफ लॅविशिंग आहे. तिच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. मात्र, शकिलशी विवाह केल्यानंतर ती नेहमीच वादात राहिली. 2022 मध्ये मलायकाच्या एका कॉमेडी शोमुळे ती नाराज देखील झाली होती. 

View this post on Instagram
 
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

View this post on Instagram
 
A post shared by Amrita Arora Ladak (@amuaroraofficial)

इतर महत्वाच्या बातम्या 

Video : भर कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून नोरा फतेहीनं केला डान्स; नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget