![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!
Dharmaveer : लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
![Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज! Dharmaveer mukkam post thane Movie trailer get 60 lacs views in 24 hours Dharmaveer : सोशल मीडियावरही दिसतेय ‘धर्मवीर’ची क्रेझ! अवघ्या 24 तासांत ट्रेलरला लाखो व्ह्यूज!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/d227bfade006253309be7074086b4afc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (Dharmaveer mukkam post thane) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. आज, अर्थात 13 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू झाले आहे. सगळीकडे मोठमोठाले होर्डींग्स झळकत आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर बघायला मिळत असून, या भागातून जाणा-या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाश्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही अवघ्या काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळाले आहे.
आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलाही भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता प्रसाद ओक याने नुकतीच या संदर्भात एक पोस्ट केली आहे.
अवघ्या 24 तासांत 60 लाख व्ह्यूज!
‘सोशल मीडियावर चर्चा फक्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटाच्या ट्रेलरचीच. केवळ 24 तासांमध्ये ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेत 60 लाख व्ह्यूज. या प्रचंड प्रेमासाठी प्रेक्षकांचे लाख लाख आभार! धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी Book My Show वरुन तिकीट बुक करा’, अशी पोस्ट शेअर करत प्रसाद ओकने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
पाहा पोस्ट :
लोकांचा नेता, जननायक अशी ओळख असणा-या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेहऱ्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी एवढं लिलया साकारलं आहे की, साक्षात दिघे साहेबच पडद्यावर बघितल्याचा भास होतोय अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत. याच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशन सोहळा मुंबई येथे अनेक मान्यवर आणि चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)