अमितकुमार यांनी सेटवरच नाराजी व्यक्त करायला हवी होती; 'इंडियन आयडॉल'चा सूत्रसंचालक आदित्य नारायण याचा खुलासा
एपिसोड शूट झाल्यानंतर अमितकुमार यांनी या झालेल्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती
मुंबई : महाराष्ट्रात चित्रिकरण थांबल्यानंतर अनेक मालिका, शो परराज्यात गेले. त्यापैकीच एक आहे इंडियन आयडॉल हा रियालिटी शो. या शोमध्ये असलेल्या गायकांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर मोहीनी घातली आहे. अरुणिता, आशीष कुलकर्णी, पवनदीप, षण्मुखप्रिया अशा शोमधल्या सगळ्याच गायकांनी धमाल उडवून दिली आहे. या शोमध्ये वेगवेगळे पाहुणे येत असतात अगदी रेखा, ए.आर. रेहमान, सुबोध भावे अशा अनेकांचा त्यात समावेश होतो. अशाच शोमध्ये आले होते किशोरकुमार यांचे सुपुत्र अमितकुमार.
'इंडियन आयडॉल'च्या एका एपिसोडमधून किशोरकुमार यांना आदरांजली वाहण्यात येणार होती. म्हणजे, शोमधल्या सगळ्या गायकांनी किशोरकुमार यांची गाणी सादर करायची होती. या एपिसोडचे पाहुणे-परीक्षक होते अमितकुमार. हा एपिसोड शूट झाल्यानंतर अमितकुमार यांनी या झालेल्या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मुलांनी ज्या प्रकारे गाणी गायली त्याने काही अमितकुमार यांचं समाधान झालं नाही. त्याबद्दल त्यांनी उघड बोलूनही दाखवल.
आर्थिक अडचणीत सापडली श्रृती हसन, म्हणते लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच..
अमितकुमार यांच्या या टिप्पणीनंतर कुणीच त्यावर आपलं मत दिलं नव्हतं. यात आता आदित्य नारायण पुढे सरसावला आहे. आदित्य हा या शोचा एंकरही आहे. शिवाय, उदित नारायण यांचा मुलगाही आहे. आदित्य याबद्दल बोलतना म्हणतो, अमितकुमार यांची नाराजी मला कळली आहे. पण त्यांनीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. अवघ्या दीड ते दोन तासांत आम्ही ही आदरांजली त्यांना देत असतो. शिवाय, हे शूट सध्या दमणमध्ये चालू आहे. तिथे मर्यादित माणसं आहेत. सेट वेगळा आहे. सगळी परिस्थितीच वेगळी आहे. तरीही त्यातून आम्ही उत्कृष्ट तेच द्यायचा प्रयत्न करतो आहोत.
#partnerworkout : प्रार्थना बेहेरे, सोनाली कुलकर्णीचा फिटनेस फंडा
आदित्यने आपलं मत मांडताना त्याने इतरही काही गोष्टी सांगितल्या. तो म्हणाला, अमितकुमार यापूर्वी एकदोना आमच्या सेटवर आले आहेत. त्यांच्या येण्याने आमच्या शोची शोभा वाढलीच. परवाही ते आले तेव्हा त्यांनी सगळी गाणी ऐकली. छान बोलले. या मंचावर येऊन त्यांनी किशोरदांचे काही अनुभव शेअर केले. तेव्हा जर त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितली असती तर आम्ही आणखी सुधारणा करू शकलो असतो. पण तेव्हा उलट ते याबद्दल काहीच बोलले नाहीत. आता शूट झाल्यानंतर त्यांनी ही नाराजी का व्यक्त केली हे अनाकलनीय आहे.